पुणे - एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरू आहे. त्यावर अजून ठोस तोडगा निघालेला नाही. अशात पुण्यात एका कर्मचाऱ्याला निलंबनाचे पत्र आल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. मारुती घडसिंग, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - Pune School Opening : पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु होणार, महापौर मुरलधीधर मोहोळ यांची माहिती
एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी मारुती घडसिंग हे शिवाजीनगर डेपो येथे आंदोलनाला बसले होते. दरम्यान अचानक घडसिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना घरी नेण्यात आले. धानोरी परिसरामधील रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
कारवाईचा बडगा
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. गेल्या बुधवारी कर्मचाऱ्यांची पगारवाढीची घोषणा राज्य सरकारने केली तरी, कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहिले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. कर्मचाऱ्यांच्या कृती समितीची बैठक शुक्रवारी परिवहन मंत्र्यांसोबत पार पडली होती. या बैठकीत समितीने पगारवाढीमध्ये तफावत असल्याने फेरविचार करावा तसेच, सातवा वेतन आयोग व इतर प्रलंबित मागण्यांकडेही कृती समितीने लक्ष वेधले. त्यावर फेरविचार केला जाईल, मात्र आधी कामावर रुजू व्हा, असे आवाहन करीत शनिवारपर्यंत कामगारांना अल्टिमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही कामावर रुजू न झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला होता.
हेही वाचा - Omicron Corona new Variant : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह