ETV Bharat / city

Diwali 2021 : तब्बल ६७७ वर्षांनी ‘या’ दिवशी जुळून आलाय गुरुपुष्यामृताचा दुर्मिळ योग; जाणून घ्या शुभ मुहूर्त! - दिवाळी 2021

गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. 28 ऑक्टोबर रोजी आलेला गुरुपुष्यामृत योग खरेदीसाठी हा खूप चांगला मुहूर्त आहे. पुष्य सगळ्यात चांगलं नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्रामध्ये सुरु केलेल्या सगळ्या कामांना यश मिळते, असे मानले जाते.

Guru Pushya Yoga 2021
Diwali 2021 : तब्बल ६७७ वर्षांनी ‘या’ दिवशी जुळून आलाय गुरुपुष्यामृताचा दुर्मिळ योग; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
author img

By

Published : Oct 28, 2021, 7:08 AM IST

मुंबई - दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्री आणि दसऱ्यात मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे व्यापाऱ्यांनाही पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळाले आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतीय दिवाळी शॉपिंगसाठी सर्वसाधारणपणे 21 हजार रुपये खर्च करण्याच्या तयारीत असतात. अशातच 28 ऑक्टोबर रोजी आलेला गुरुपुष्यामृत योग खरेदीसाठी हा खूप चांगला मुहूर्त आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व (Importance Of Guru Pushya Yoga) आणि याचा बाजारात काय फरक दिसून येईल, याविषयी जाणून घेऊयात....

पुष्य नक्षत्र का महत्त्वाचे ?

पृथ्वीभोवती फेरी मारताना चंद्राच्या वाटेवर दिसणाऱ्या ताऱ्यांना नक्षत्र म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्रांचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. एकूण 27 नक्षत्र आहेत. त्यात पुष्य सगळ्यात चांगलं नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्रामध्ये सुरु केलेल्या सगळ्या कामांना यश मिळते, असे मानले जाते.

677 वर्षांनी दुर्मिळ योग -

गुरुवारी पुष्य नक्षत्राचा योग असेल तर त्याला सिद्ध योग म्हटले जाते. यावर्षी दिवाळीच्या आधी 28 ऑक्टोबर 2021 ला पुष्य नक्षत्राचा योग आहे. यावेळी ज्या ग्रहदशेमध्ये पुष्य नक्षत्राचा योग येत आहे तो योग साधारणपणे 677 वर्षांनी येत आहे. याआधी असा योग 5 नोव्हेंबर 1344 ला आला होता. त्यावेळी गुरु – शनि युती मकर राशीमध्ये होऊन पुष्य योग गुरुवारी आला होता.

दिवसभर राहणार नक्षत्राचा प्रभाव -

ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबर 2021 ला दिवसभर पुष्य नक्षत्राचा प्रभाव राहिल. या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे किंवा कोणती गुंतवणूक करणे चांगले असते. त्याचा चांगला लाभ होतो. पुष्य नक्षत्र असलेल्या अशा गोष्टींची खरेदी करावी ज्या तुम्हाला दिर्घकाळ वापरायच्या आहेत. गुरु पिवळ्या वस्तूंचा कारक ग्रह असल्याने सोन्याची खरेदी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ मानली जाते. तसेच शनी लोखंडाचा कारक ग्रह असल्याने कार आणि बाईक खरेदीही शुभ मानली जाते. तसेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक, कपडे आणि भांड्यांची खरेदीपण करता येईल. गुरुपुष्यामृत योग असल्याने यादिवशी सोन्यासोबतच प्रॉपर्टी, ऑटोमोबाईल आणि ऑनलाईन विक्रीमध्ये वाढ होईल.

हेही वाचा - शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा सीडीआर काढण्यासाठी पाच लाखांची ऑफर; क्रूझ ड्रग्स प्रकरणी हॅकरचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.