पुणे - आम्ही कंगना रनौत (Kangana Ranaut Controversial statement) यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. परंतु विचार स्वातंत्र्यात काही बरगड्याचे याची लोकांना सवय झाली आहे. याला राजाश्रय मिळतंय ही दुर्दैवी बाब आहे. या लोकांना स्वातंत्र्य लढ्याचा गंधही नाही. कोणी कोणी काय केले कसे या देशाला स्वातंत्र मिळाले हे यांना माहीत नाही. जी लोक तुरुंगात गेली आपले रक्त साडले. या स्वातंत्र्यासाठी त्या सर्व महान असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे. शासनाकडून अशा व्यक्तींना गौरविले जाते आणि त्या व्यक्तींने अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यासाठी बोलले जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे, असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली आहे. जी मानसिकता भारतीय जनता पक्षाच्या वतीने पसरविली जात आहे. हिंदुत्ववादाची जी फॅसिस्ट फिलॉसॉफी त्याआधारे असे लोक वक्तव्य करून समाजात अंतर निर्माण करत आहे. आजपर्यंत कोणीही स्वातंत्र्य सैनिकांबद्दल अशा पद्धतीने अनादरपणे बोलले नव्हते. हे अत्यंत निषेधार्थ आहे, असेही ते म्हणाले.
'एस टी कर्मचाऱ्यांबाबत तोडगा निघणार'
शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असून बरेच तोडगा काढण्यात आले आहेत. जगात कुठेही सार्वजनिक सेवा ही नफ्यात चालत नाही. त्याला शासनाकडून अनुदान द्यावे लागतो. अनुदान देताना त्यावर तोडगा काढण्यात आला पाहिजे. एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामंजस्याने योग्य तो तोडगा निघणार आहे, असे देखील यावेळी चव्हाण म्हणाले.
'ज्यांना राजाश्रय मिळत आहे तेच आज बोलत आहे'
भारतीय संविधानाने विचार स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य दिल आहे. त्याचा दुरूपयोग केला जात आहे. ज्यांना राजाश्रय मिळत आहे, अशा लोकांकडूनच बोललं जातं आहे. इतर कोणी बोललं असत तर त्याला तुरुंगात टाकलं असत. आज जी हुकूमशाही सुरू आहे त्याला जे एखाद्या व्यंगचित्रकाराने किंवा कलाकाराने काही बोलत किंवा लिहिलं की त्याला तुरुंगात टाकलं जात आहे, अशी दहशत आज आहे. ज्याने देशाचा कायदा मोडला असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. असे देखील यावेळी चव्हाण म्हणाले. भारत हा सेक्युलर आहे. याचा अर्थ असा की या राज्याचा धर्म नाही तर व्यक्तीचा धर्म आहे. पण हे लोक सरकारचा आणि राज्याचा एकच धर्म आहे, असे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे घटनेला अभिप्रेत नाही. आत्ता या लोकांचा प्रयत्न आहे की एकाच विचाराचं राज्य आणायचं आहे आणि लोकशाही संपवायचं आहे. असा प्रयत्न यांचा आहे, असे देखील यावेळी चव्हाण म्हणाले.
'विक्रम गोखले यांनी एखाद्या पक्षात प्रवेश करावं'
अभिनेते विक्रम गोखले यांनी जे काही म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात याव. एखाद्या पक्षात प्रवेश करावं, निवडणूक लढवावी आणि मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हावे, असा टोला देखील यावेळी चव्हाण यांनी लगावला आहे.
हेही वाचा - कंगना रणौत जे बोलली, त्याच्याशी मी सहमत; विक्रम गोखलेंकडून पाठराखण