पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari Controversy Statement ) यांनी सांगलीतील सभेत कन्यादानाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याविरोधात काल ( 21 एप्रिल ) ब्राम्हण महासंघाने आंदोलन केले होते. त्यानंतर आता भाजप युवामोर्चाने अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याला दिले ( BJP Yuva Morcha Demand Filed FIR ) आहे.
पोलिसांना दिलेल्या पत्रात भाजप युवामोर्चाने म्हटले की, सांगलीतील इस्लामपूर येथील सभेत बोलताना अमोल मिटकरींनी ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्मात कन्यादान या पवित्र विधीचा अपमान केला आहे. या विधानामुळे तमाम हिंदू धर्मातील बांधवांच्या व ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावना अमोल मिटकरींनी दुखावल्या असून, सामाजिक ऐक्यात तेढ निर्माण केला आहे. ब्राह्मण समाजातील मोठा घटक हा पौरोहित्यवर आपली ऊपजिविका चालवतो. अमोल मिटकरी यांनी हे विधान मुद्दाम केले असून, ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
अमोल मिटकरींनी सामाजिक तेढ निर्माण होईल, असे मुद्दामून भाषण केले. तसेच, ब्राह्मण समाजातील पौरोहित्य करणाऱ्या सर्व बांधवांची खिल्ली उडवत तमाम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात करावा. गुन्हा दाखल केला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशाराही भाजप युवामोर्चाच्या वतीने देण्यात आला.
हेही वाचा - Navneet Rana vs Shivsena : शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; मातोश्रीवरील सुरक्षेत वाढ