पणजी (गोवा) - गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली. राज्यभरात १ हजार ७२२ मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी नऊ वाजतापर्यंत 11.04% टक्के मतदान झाले. तर अकरा वाजतापर्यंत 26 टक्के मतदान झाले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात एकुण 83 टक्के मतदान झाले होते. उत्तर गोव्यात 84.71 टक्के तर दक्षिण गोव्यात 80.53 टक्के इतके मतदान झाले होते. या निवडणुकीत 1 हजार 642 मतदान केंद्रावर 11 लाख पेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकुण 250 उमेदवार निडणुकीच्या रिंगणात होते.
गोवा निवडणुकीत ९ प्रादेशिक पक्ष आपले नशीब आजमावत आहेत. ४० जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सतर्कता बागळली गेली आहे. गोव्यात एकूण ११ लाख ५६ हजार ७६२ मतदार आहेत. त्यामध्ये ५ लाख ६२ हजार ७९० पुरुष तर ५ लाख ९३ हजार ९६८ महिला मतदार आहेत. तर ४ तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी सात वाजतापासून निवडणुकीस सुरूवात झाली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी नऊ वाजतापर्यंत 11.04% टक्के मतदान झाले तर अकरा वाजतापर्यंत 26 टक्के मतदान झाले. तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असून अधिकाधिक लोकांनी विक्रमी मतदान करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांना केले. 2017 साली कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले, याची टक्केवारी पाहुयात...
2017 मधील मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
१. मांद्रे – 87.38
२. पेडणे – 86.62
३. डिचोली – 88.11
४. थिवी – 83.71
५. म्हापसा- 78.34
६. शिवोली – 82.43
७. साळगाव- 80.05
८. कळंगूट- 81.48
९. पर्वरी- 79.64
१०. हळदोणे – 78.05
११. पणजी – 77.06
१२. ताळगाव – 79.84
१३. सांताक्रूझ – 79.84
१४. सांत आंद्रे – 79.16
१५. कुंभारजुवे – 81.04
१६. मये – 87.71
१७. साखळी – 89.11
१८. पर्ये – 87.99
१९. वाळपई – 86.27
२०. प्रियोळ – 89.22
२१. फोंडा – 80.57
२२. शिरोडा – 85.76
२३. मडकई – 84.42
२४. मुरगाव – 79.58
२५. वास्को द गामा – 71.76
२६. दाबोळी – 76.00
२७. कुठ्ठाळी – 76.44
२८. नुवे – 75.44
२९. कुडतरी –76.44
३०. फातोर्डा – 78.07
३१. मडगाव- 77.52
३२. बाणावली – 74.11
३३. नावेली – 77.38
३४. कुंकळ्ळी – 76.20
३५. वेळ्ळी – 74.76
३६. केपे – 83.94
३७. कुडचडे – 81.67
३८. सावर्डे – 88.00
३९. सांगे – 86.77
४०. काणकोण – 83.5