ETV Bharat / city

Kargil Vijay Diwas Nagpur : नागपुरात निवृत्त सैन्य अधिकारी आणि जवानांनी दिली शहिदांना मानवंदना

author img

By

Published : Jul 26, 2022, 2:51 PM IST

Updated : Jul 26, 2022, 3:16 PM IST

नागपुरच्या अजनी चौकातील अमर जवान स्मारक ( Amar Jawan Memorial ) येथे माजी सैनिक संघटना 'ईवान' तर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी लष्करराचे निवृत्त सैन्य अधिकारी, जवान आणि सामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते. 23 वा कारगिल विजय दिवस ( Kargil Vijay Diwas ) देशभरात अभिमानाने साजरा करण्यात येत आहे.

शहिदांना अभिवादन
शहिदांना अभिवादन

नागपूर - कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ नागपुरच्या अजनी चौकातील अमर जवान स्मारक ( Amar Jawan Memorial ) येथे माजी सैनिक संघटना 'ईवान' तर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी लष्करराचे निवृत्त सैन्य अधिकारी, जवान आणि सामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते. 23 वा कारगिल विजय दिवस ( Kargil Vijay Diwas ) देशभरात अभिमानाने साजरा करण्यात येत आहे. शेजारी राष्ट्र पाकिस्तानने घुसखोरी करत भारताच्या हद्दीत प्रवेश करून सर्वात उंच टायगर हीलवर कब्जा केला. टायगर हिलवरून पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैन्यावर हल्ला केला. त्यावेळी भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानला चोख प्रतिप्रत्युत्तर दिले.

अभिवादन करताना माजी सैन्य अधिकारी

सुमारे तीन महिने भारतीय सैनिकांनी पाकिस्तान सोबत कडवी झुंज दिल्यानंतर 26 जुलै रोजी भारतीय सैनिकांनी आजच्याच दिवशी टायगर हिल परत कब्जा मिळविला होता. या लढाईत शेकडो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. हा विजय कारगिल युद्धातील सर्व वीर जवानांना समर्पित करण्यात आला.

निवृत्त सैनिकांनी दिली मानवंदना : कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ नागपुरच्या अजनी चौकातील अमर जवान स्मारक येथे माजी सैनिक संघटना "ईवान" तर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी लष्करराचे निवृत्त सैन्य अधिकारी, जवान आणि सामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी शहीद स्मारकाला पुष्प चक्र अर्पण करून सलामी देण्यात आली. भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला उजाळा देण्यात आला. भविष्यात आणि युद्धात शत्रूचे मनोधैर्य खच्चीकरण करायच असेल तर आपण मिळविलेले विजय अशाच प्रकारे साजरे करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी निवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Kargil Vijay Diwas : राक्षसांनाही लाजवेल अशी पाकिस्तानी सैन्याची क्रूरता, निवृत्त कर्नलने सांगितल्या कारगिलच्या आठवणी

Last Updated : Jul 26, 2022, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.