ETV Bharat / city

भारत वन क्षेत्रातील अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचा प्रस्ताव रद्द, नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत - Road proposal in Bharat forest area of Nagpur canceled

महामेट्रोकडून नागपूरच्या भारत वन क्षेत्र येथील सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. यामुळे भारत वन क्षेत्रातील वृक्ष तोड थांबणार आहे.

Half a kilometer of road in India forest area was rejected
भारत वन क्षेत्रातील अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचा प्रस्ताव रद्द
author img

By

Published : Jan 16, 2020, 1:23 PM IST

नागपूर - महामेट्रोकडून नागपूरच्या भारत वन क्षेत्र येथील सुमारे अर्धा किलोमीटर लांब रस्त्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. यामुळे भारत वनातील मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींसह भारत नगर येथील नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.

भारत वन क्षेत्रातील अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचा प्रस्ताव रद्द

नागपूरच्या पश्चिम भागातील भारत वन हे भारत नगरच्या शेजारी आहे. शहरातील एक मोठे जंगल म्हणूनही याची ओळख आहे. सुमारे अडीच किलोमीटर किलोमीटर लांब व एक किलोमीटर पेक्षाही जास्त विस्तीर्ण असा या जंगलाचा परिसर आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या या नैसर्गिक जंगलात 32 प्रकारचे वृक्ष व 138 प्रकारच्या पक्षांचा अधिवास आहे. जंगलाच्या शेजारील फुटाळा तलावाचा विकास करण्याचे प्रशासनाने ठरवले. या तलावाच्या विकास कामांमुळे भारत वनमधून रस्ता प्रस्तावित करण्यात आला. अर्धा किलोमीटर लांब व 18 मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या बांधकामामुळे या वनातील जैव विविधतेला धोका उत्पन्न झाला होता. रस्त्याकरता जंगलातील 558 झाडांची कत्तल करण्यात येणार होती. मात्र, पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केल्याने रस्त्याचा प्रस्ताव प्रशासनाने आता रद्द केला आहे.

वृक्षतोड करून भारत वनातून रस्त्याच्या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. गेले वर्षभर यासाठी विविध आंदोलनेही करण्यात आली. नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता महामेट्रो, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रस्तावित रस्त्यामुळे वन संपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. वनसंपदेने समृद्ध असलेल्या भारत वनावर संकट आले होते. आता रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिक व पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे.

Intro:महामेट्रोकडून नागपूरच्या भारत वन क्षेत्र येथील सुमारे अर्धा किलोमीटर लांब रस्त्याचा प्रस्ताव रद्द केला आहे... यामुळे भारत वनातील मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबणार आहे... प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींसह भारत नगर येथील नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.
Body:नागपूरच्या पश्चिम भागातील भारत वन हे भारत नगरच्या शेजारी आहे... शहरातील एक मोठं जंगल म्हणूनही याची ओळख आहे... सुमारे अडीच किलोमीटर किलोमीटर लांब व एक किलोमीटर पेक्षाही जास्त विस्तीर्ण असा या जंगलाचा परिसर आहे... पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या या नैसर्गिक जंगलात 32 प्रकारचे वृक्ष व 138 प्रकारच्या पक्षांचा अधिवास आहे... जंगलाच्या शेजारील फुटाळा तलावाचा विकास करण्याचे प्रशासनाने ठरवले... या तलावाच्या विकासकामामुळे भारत वन मधून रस्ता प्रस्तावित करण्यात आला... अर्धा किलोमीटर लांब व 18 मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या बांधकामामुळे या वनातील जैव विविधतेला धोका उत्पन्न झाला होता... रस्त्याकरिता जंगलातील 558 झाडांची कत्तल करण्यात येणार होती... परंतु पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केल्याने रस्त्याचा प्रस्ताव प्रशासनाने आता रद्द केला आहे.
वृक्षतोड करून भारत वनातून रस्त्याच्या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता... गेले वर्षभर यासाठी विविध आंदोलनेही करण्यात आले... नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता महामेट्रो,महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला... या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.प्रस्तावित रस्त्यामुळे वन संपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते... वनसंपदेने समृद्ध असलेल्या भारत वणावर संकट आले होते..आता रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिक व पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे.

बाईट -- अनुसया काळे (पर्यावरणप्रेमी)
बाईट -- जयदीप दास (मानद वन्यजीव रक्षक)
बाईट -- संदीप जोशी ( महापौर)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.