ETV Bharat / city

Nagpur Rain Update : विदर्भावर पावसाची वक्रदृष्टी; पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

author img

By

Published : Jun 29, 2022, 1:51 PM IST

यावर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस होणार अशी भविष्यवाणी हवामान खात्याने केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिकांची पेरणी केली होती. मात्र, आता पावसाने गेल्या आठ दिवसांपासून पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. पावसाअभावी पेरलेले उगवले नाही तर दुबार पेरणीचा धोका निर्माण झाला आहे.

Nagpur Rain Update
विदर्भावर पावसाची वक्रदृष्टी

नागपूर - विदर्भात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच विदर्भात काहीसे उशिरा पावसाचे आगमन झाले होते. त्यातच आता 22 जूननंतर पाऊस गायब झाल्याने विदर्भातील काही भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या झाल्यानंतर पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

सरासरीपेक्षा चांगला पाऊस होणार - यावर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस होणार अशी भविष्यवाणी हवामान खात्याने केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिकांची पेरणी केली होती. मात्र, आता पावसाने गेल्या आठ दिवसांपासून पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही, तर पेरलेला पहिला पेरा वाया जाण्याची शक्यता आहे. १६ जून रोजी विदर्भात मान्सून सक्रिय झाला होता. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. परंतु त्यानंतर आठ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. पावसाअभावी पेरलेले उगवले नाही तर दुबार पेरणीचा धोका निर्माण झाला आहे.

पुढील पाच दिवसासाठी अंदाज जाहीर - प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील पाच दिवस विदर्भात कधी पाऊस येईल, याचा अंदाज दिला आहे. त्यानुसार 28 ते 30 जूनपर्यंत सर्व जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर 1 आणि 2 जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.