ETV Bharat / city

Amravati violence : रझा अकादमीवर बंदी आणा, राज्यपालांना भेटणार - विश्व हिंदू परिषद

author img

By

Published : Nov 15, 2021, 5:13 AM IST

Updated : Nov 15, 2021, 6:42 AM IST

'अमरावतीत घडलेला हा प्रकार हा कट एका अकादमी आणि इतर 6 संगठनानी घडवून आणला आहे. त्रिपुराच्या कथित घटनेच्या (Tripura violence) विरोधात एकत्रित येण्याचे आवाहन केले. त्यानंतर षडयंत्र रचत हिंसाचार घडविला आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करावी यासाठी मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ((Governor Bhagat Singh Koshyari) ) यांची भेट घेण्यार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे (Milind Parande) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Vishwa Hindu Parishad on Raza Academy in nagpur
Amravati violence : रझा अकादमीवर बंदी आणा, राज्यपालांना भेटणार - विश्व हिंदू परिषद

नागपूर - त्रिपुरा हिंसाचाराच्या (Tripura violence) पार्श्वभूमीवर अमरावती (Amravati violence) आणि राज्याच्या इतर भागात ज्या जाळपोळीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत त्याविरोधात विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) आपली भूमिका माध्यमासमोर मांडली आहे. या घटनेचा निषेध नोंदवत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन या संघटनावर प्रतिबंध आणावा अशी मागणी करणार असल्याचे विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे (Milind Parande) यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते नागपूरत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यलयात बोलत होते.

'ही कृती अयोग्य आहे'

'अमरावतीत घडलेला हा प्रकार हा कट एका अकादमी आणि इतर 6 संगठनानी घडवून आणला आहे. 'त्रिपुराच्या कथित घटनेच्या विरोधात एकत्रित येण्याचे आवाहन केले. त्यानंतर षडयंत्र रचत हिंसाचार घडविला आहे. ज्यावेळी समुदाय रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात उतरला, त्यावेळी पोलीस आणि प्रशासनाने कुठे गेले होते?' असा सवाल ही विश्व हिंदू परिषदेकडून उपस्थित करण्यात आला आहे . तेच दुसऱ्या दिवशी काही समाज बांधव रस्त्यावर उतरले असताना त्याच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडण्यात आले. ही कृती अयोग्य आहे. त्यामुळे त्या अकादमी आणि इतर संगठनांवर कठोर कारवाई करत बंदी आणावी' अशी मागणी सुद्धा विश्व हिंदू परिषदने केली आहे.

मिलिंद परांडे यांनी उपस्थित केला प्रश्न -

'त्या अकादमीचा इतिहास हा वादग्रस्त राहिला आहे. 2012 मध्ये मुंबईत आझाद मैदानावर जे घडले, त्यावेळी सुद्धा मोठ्या संख्यने समूह हे एकत्र आले होते. यावेळी सुद्धा अमरावतीमध्ये किंवा अन्य काही भागात घडले तेव्हा पोलीस प्रशासनाला या बाबतीत काहीच पूर्व सूचना मिळाली नाही काहीच कसे कळले नाही?' असा प्रश्न मिलिंद परांडे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपाल यांची भेट घेणार -

'त्यामुळे जे घडवून आणले त्या अकादमी आणि इतर संघटनानावर हिंसाचाराचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. या विरोधात विश्व हिंदू पररिषद तक्रारीं करणार आहे. ज्या शिवसेनेने इतके वर्ष हिंदुत्वचा नारा दिला त्यांच्या सरकारच्या काळात अशा घटना घडत आहे हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणालेत. त्यामळे या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने राज्यपाल यांची भेट घेऊन कारवाई तसेच रझा अकादमी बंद करावी' अशी मागणी करणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

हेही वाचा - Raza Academy Reaction : अमरावती, मालेगाव हिंसाचाराशी रझा अ‍ॅकेडमीचा संबंध नाही - सईद नुरी

Last Updated : Nov 15, 2021, 6:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.