ETV Bharat / city

Ajit pawar on reservation to govinda मग स्पर्धा परीक्षा देणारे काय करणार, गोविंदांना आरक्षणावर अजित पवारांचा सवाल

author img

By

Published : Aug 20, 2022, 11:32 AM IST

गोविंदांना नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर नागपुरात अजित पवार Ajit pawar on reservation to govinda in jobs यांनी भाष्य केले आहे. भावनिक होऊन कुठलेही निर्णय घेऊन चालत नाही, असा सल्ला विरोधी reservation to govinda in jobs in maharashtra पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ajit pawar on dahi handi मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

ajit pawar on reservation to govinda in jobs
गोविंदा आरक्षण नोकरी अजित पवार प्रतिक्रिया

नागपूर - गोविंदांना नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर नागपुरात अजित पवार यांनी भाष्य Ajit pawar on reservation to govinda in jobs केले आहे. भावनिक होऊन कुठलेही निर्णय घेऊन चालत नाही, असा सल्ला विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. अजित पवार हे अमरावतीतील reservation to govinda in jobs in maharashtra मेळघाटाच्या दौऱ्यासाठी विदर्भात आले आहेत. यावेळी नागपुरात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी ajit pawar on dahi handi ही भूमिका व्यक्त केली.

हेही वाचा Abdul Sattar कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस शेती करणार आणि शिकणार

बाकीचे स्पर्धा परिक्षा देणारे काय करणार पुणे सह इतरही भागात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. वेगेवेगळ्या प्रकारचे मान्यता असलेले खेळ खेळतात. ते खेळ खेळून राष्ट्रीय पातळीवर जेव्हा खेळाडू नाव लौकिक करतात तेव्हा त्याना नोकरित शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना आरक्षण देतो. पण, दहीहंडी या खेळाचा काय रेकॉर्ड ठेवतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कबड्डी खेळाचा रेकॉर्ड असतो, त्यांची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होते. यात गोविंदाचा रेकॉर्ड कसा ठेवणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होत नाही. मुख्यमंत्री ठाण्याचे प्रतिनिधित्व करतात, तिथे दहीहंडी हा मोठ्या प्रमाणत साजरा होतो. त्यांना पाच टक्के आरक्षण देताना एखादा न शिकलेला उमेदवार असेल तर बाकीचे स्पर्धा परिक्षा देणारे काय करणार असाही प्रश्न उपस्थित केला. पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्या परीक्षा का घेत नाही? असा सवाल उपस्थित केला. तसेच आमच्या सरकारच्या काळात दुर्दैवाने काही पेपरफुटी प्रकार घडले. पण आता पारदर्शकता ठेवून परीक्षा घ्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

लोकशाहीत मनात विचार आला म्हणून काहीही करता येत नाही महाराष्ट्राच्या कानाकोपरात स्पर्धा परीक्षेसाठी आरक्षण असल्याने मुले तयारी करत आहेत, याचाही विचार मुख्यमंत्री यांनी करायला पाहिजे. भावनिक होऊन निर्णय न घेता जबाबदारीने आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. एकदा गोविंदाच्या कुटुंबीयांना विमा देण्याला हकरत नाही. पण अशा पद्धतीने पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा ही चुकीची आहे. लोकशाहीत मनात आले तसे जाहीर करता येत नाही, सर्वांचा विचार घ्यावा लागतो, असाही सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

कुठल्याही धमकीला गांभीर्याने घेतले पाहिजे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींना धमकी आली. त्यामागे काही विकृत लोक होते. पण, तशी धमकी येत असेल तर ती धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे. धमकी देण्यामागे काय हेतू आहे, त्यामागे कोण लोक आहे, दहशतवादी संघटना तर नाही ना, याची दखल घेतली पाहिजे. राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या यंत्रणांनीही ते तपासले पाहिजे, असे मुंबईला दिलेल्या धमकीवर अजित पवार म्हणाले.

मेळघाटमधील कुपोषणाचे गांभीर्य अधिवेशनात मांडणार अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भागात कुपोषण, बालमृत्यू प्रमाण मोठे असून 100 पेक्षा जास्त घटना घडला असल्याने वस्तुस्थिती पाहण्यासाठी आलो आहे. यात मेळघाट आणि धारणीला जाऊन घटनेचे गांभीर्य अधिवेशनात मांडून सरकारपर्यंत त्या परिस्थितीचे गांभीर्य पोहोचवणार असल्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले. शेतपिकांच्या नुकसान भरपाई संदर्भात निकष बदलले पाहिजे. जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे. यावरही मुख्यमंत्री सोमवारी उत्तर देतील असे अपेक्षित आहे. विरोधीपक्ष म्हणून कसूर होता कामा नये याची जबाबदारी घेत असल्याचे अजित पवार म्हणाले.

आरोग्य सुविधा न मिळणे दुर्दैवी पालघरमध्ये एका भगिनिला प्रसुतीसाठी झोळीत न्यावे लागले, एकीला रुग्णवाहिका मिळाली नाही. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असताना आरोग्य सेवा न मिळणे दुर्दैवी घटना आहे. कोरोना काळात आरोग्य, पायाभूत सेवा ठाकरे सरकारने उभारल्या आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या घटनेबद्दल माहिती घेऊन अधिवेशनात तो मुद्दा मांडणार, असेही अजित पवार म्हणालेत.

हेही वाचा World Photography Day जागतिक फोटोग्राफी दिवस, ४० वर्ष प्रेस फोटोग्राफर म्हणून काम केल्यानंतरही फोटोग्राफरला चालवावा लागतो ई रिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.