ETV Bharat / city

Mumbai Historical Place : ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, पर्यटकांना पाहता येतील 'या' वास्तू

author img

By

Published : May 21, 2022, 6:36 PM IST

Updated : May 21, 2022, 6:51 PM IST

भारतावर इंग्रजांचे राज्य असताना मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू ( Historical Place In Mumbai ) आणि शिल्प उभारण्यात आली. भारत देश स्वतंत्र झाल्यावर कालांतराने या वास्तू आणि शिल्प लुप्त झाली. मुंबईतील ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभाग व उद्यान विभाग ( Mumbai Muncipal Corporation ) यांनी पुढाकार घेतला आहे.

Mumbai Historical Place
Mumbai Historical Place

मुंबई - भारतावर इंग्रजांचे राज्य असताना मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू ( Historical Place In Mumbai ) आणि शिल्प उभारण्यात आली. भारत देश स्वतंत्र झाल्यावर कालांतराने या वास्तू आणि शिल्प लुप्त झाली. मुंबईतील ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभाग व उद्यान विभाग ( Mumbai Muncipal Corporation ) यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईकरांना आणि येणाऱ्या पर्यटकांना या ऐतिहासिक वास्तू पाहत्या याव्यात यासाठी जतन केल्या जात आहेत.

रिपोर्ट

फ्लोरा फाऊंटन - मुंबई उच्च न्यायालयासमोर असलेल्या चौकात युकेमधील पोर्टलँड दगडापासून 1864 मध्ये फ्लोरा फाऊंटन (कारंजा) बांधण्यात आला. अभियांत्रिकी सेवेचा आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून फ्लोरा फाऊंटन ओळखले जाते. तीन लेअरच्या या कारंजामध्ये दोन्ही बाजूला असलेले सिंह आणि डॉल्फिन यांच्या तोंडातून पाणी खाली पडत असते. 2007पर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. त्यानंतर हे कारंजे बिघडले व त्यातून पाणी यायचे बंद झाले. सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून 2018-19 मध्ये याचे नूतनीकरण करण्यात आले होते.

फ्लोरा फाऊंटन
फ्लोरा फाऊंटन

ट्रॅमचे रूळ - मुंबईत ट्रॅम बंद झाल्यावर गेल्या काही दशकात विकास कामे, रस्त्याची कामे झाल्याने फोर्ट परिसरातील ट्रामचे रूळ रस्त्याखाली गेले. या विभागातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जात असताना खोदकाम करताना ट्रामचे रूळ आढळून आले. या रुळांचे जतन बेस्टच्या आणि डेपो येथील संग्रहालयात ठेवले जाणार होते. मात्र, नंतर हे रूळ लोकांना सहज पाहाता यावेत, यासाठी उच्च न्यायालयाच्या समोर फ्लोरा फाऊंटन जवळ जतन करण्यात आले आहेत.

Mumbai Historical Place
ट्रॅमचे रुळ

ऐतिहासिक ट्रॅम - 9 मे 1874 ला घोडाद्वारे ओढली जाणारी पहिली ट्रॅम मुंबईमध्ये धावली. सुरुवातीला ट्रॅमच्या तिकिटाचा दर हा तीन आणे होता. प्रवाशांच्या वाढता प्रतिसादानंतर तिकिटाचा दर दोन आणे करण्यात आला. सुरुवातीला ट्रॅमची छापील तिकिटे नव्हती, त्यानंतर काही महिन्यांनी तिकीटे छापण्यात आली 1905 मध्ये "बेस्ट" म्हणजेच 'बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रॅमवे' कंपनीची स्थापना करण्यात आली. 1907 मध्ये घोड्यांच्या सहाय्याने ओढल्या जाणाऱ्या ट्रॅम बंद करण्यात आल्या. त्यानंतर मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रिक ट्रॅम धावली. 1926मध्ये डबल डेकर ट्रॅमही शहरात धावली. 15 जुलै 1926 मध्ये शहरात पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली. ही ऐतिहासिक ट्रॅम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील भाटिया बागेत जतन करण्यात आले आहे.

विजेच्या खांबांना ऐतिहासिक साज - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फोर्ट परिसरात ऐतिहासिक इमारती आहेत. याठिकाणी देशातून तसेच परदेशातून पर्यटक भेटी देतात. ऐतिहासिक इमारती पाहून पर्यटक भारावून जातात. येथील विभागात आलेल्या पर्यटकांना ऐतिहासिक विभागात आल्याची जाणीव व्हावी, यासाठी पालिकेने विजेच्या खांबांना ऐतिहासिक साज दिला आहे.

स्वातंत्र्य संग्राम स्मृती उद्यान - मंगल गडीया आणि सय्यद हुसेन हे 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात पहिले शहिद झाले. ब्रिटिशांनी 15 ऑक्टोबर 1857 ला या दोघांना एस्पनेड ग्रास म्हणजेच आताचे आझाद मैदान इथे क्रूरपणे शेकडो लोकांच्या समोर तोफेच्या तोंडी दिले. यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुंबई महापालिका मुख्यालय आणि आझाद मैदानाच्या समोर भारतीय स्वातंत्र्य संग्राम स्मृती उद्यान बनवण्यात आले आहे. याठिकाणी 1857 सालची तोफही ठेवण्यात आली आहे. येथे मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने या कामानंतर पुन्हा या स्मृतीस्थळाचे काम केले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाचे अभियंता संजय सावंत यांनी दिली.

लायन्स उद्यानात तोफांचे जतन - घाटकोपर येथील टिळक रोडवर असलेल्या लायन्स उद्यानात 1856 च्या दोन तोफा आढळून आल्या आहेत. या दोन्ही तोफा जतन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेने किल्यामध्ये तोफ असे डिझाइन तयार केले आहे. येत्या काही महिन्यात या तोफा जशा दिसत होत्या तशा प्रकारे जतन केल्या जातील, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

Mumbai Historical Place
ऐहतिहासिक तोफ

मैलाचा दगड - मुंबईमध्ये इंग्रजांच्या काळात हर्निमन सर्कल येथून टांगा आणि बैलगाडी सुटत असे. मुंबईत इंग्रजांनी रस्ते बनवले त्या रस्त्याचे अंतर मैलामध्ये मोजले जात होते. त्यासाठी इंग्रजांनी सायन आणि माहीमपर्यंत असलेल्या रस्त्यावर मैलाचे दगड लावले होते. यातील काही दगड जमिनीखाली, रस्त्याखाली गाढले गेले होते. काही दगड तुटले होते. अशा १५ दगडांचा शोध लाऊन त्याचे जतन पालिकेने केले आहे.

हेही वाचा - Sonu Nigam : सोनू निगमचा पुन्हा एकदा चर्चेत, 'तो'जुना व्हिडिओ पुन्हा होतोय व्हायरल

Last Updated : May 21, 2022, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.