मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार अद्याप न झाल्याने एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची घालमेल ( Uneasiness Among Shinde Faction MLAs ) सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची इच्छा ( Many are Looking for a Ministerial Position ) असल्याने मंत्रिमंडळ विस्तार करताना नाराजी निर्माण होऊ नये, असे मोठे आव्हान मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहे.
अजून मंत्रिमंडळ विस्तार नाही : 23 दिवस उलटून गेले तरी, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने सातत्याने विरोधकांकडून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली जातेय. मात्र लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे सांगत आहेत. दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवला गेला नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिंदे गटाच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा : यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदे गटासोबत असलेल्या आमदार आत मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होऊ शकते असेही म्हटले जातेय. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्यांपैकी बऱ्याच बंडखोर आमदारांना मंत्रिपदाची आशा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना या सर्वांचे लक्ष ठेवूनच मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल. यासाठीच या विस्ताराला उशीर होत असल्याचेदेखील म्हटले जातेय.
मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळ विस्ताराचे आव्हान : शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या 40 आमदारांमध्ये 9 मंत्री देखील सामील होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्र्यांची संख्या शिंदे गटात आहे. यासोबतच इच्छुकांचीदेखील संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्तार केल्यास एकनाथ शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उमटण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेऊनच मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्र्यांना करावा लागणार आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार करण्याआधी सर्वांचे समाधान होईल, अशी मंत्रिमंडळ विस्ताराची आखणी केली जातेय. इच्छुकांपैकी एखाद्यास मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही तर, नाराजी ओढवण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे सर्वांचं समाधान होईल अशी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर असल्याचे मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केल आहे.
शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार : माजी मंत्री उदय सामंत ( Former Minister Uday Samant ), माजी मंत्री दादा भुसे ( Former Minister Dada Bhuse ) , माजी मंत्री संदिपान भुमरे, माजी मंत्री राज्य शंभूराजे देसाई, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री संजय राठोड, आमदार दीपक केसरकर, आमदार संतोष बांगर, आमदार संजय शिरसाट, आमदार भरत गोगावले, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार आशिष जयस्वाल, आमदार प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंत, आमदार सुहास कांदे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार संजय गायकवाड असे 18 आमदारांची नावे सध्या एकनाथ शिंदे गटाकडून चर्चेत आहे. तसेच या व्यतिरिक्त देखील काही इच्छुक आमदार यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे घेतील तो अंतिम निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेचे 40 तर अपक्ष दहा आमदारांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाला काय मिळेल याबाबत कधी पन्नास आमदारांमध्ये चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे गटात असलेल्या आमदारांकडून त्यांना कधीही विचारलं होत नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं हे सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दोन्ही पक्षाकडून ज्येष्ठ नेते जे ठरवतील ते सर्वांना मान्य असेल.
मुख्यमंत्री निर्णय घेतील तो मान्य : तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांसाठी एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल त्यामुळे सत्तेत असलेल्या शिवसेनेत मंत्रिपदासाठी कोणतीही रस्सीखेच नाही असं मत बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. मात्र असं असलं तरी ज्या कोणाला मंत्रीपदाची जबाबदारी मिळेल ते आनंदाने स्वीकारतील असं म्हणत त्यांनी आपल्याला मंत्रिपद मिळाला तर आपणही राज्याच्या विकासासाठी काम करू असं म्हटलं. त्यामुळे एकनाथ शिंदे गटात असलेल्या अनेक आमदार मंत्रिपदाची सुप्त इच्छा असल्याचं समोर येत आहे.
मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 25 जुलैला दिल्लीत असणार आहे. नवनियुक्त राष्ट्रपती यांच्या शपथविधी सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीला बोलावले आहे. त्यामुळे सोमवारी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे उपस्थित असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळेल अशी आशा एकनाथ शिंदे गटाला आहे.
हेही वाचा : Neeraj Chopra, World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्य पदक