नालासोपारा - नालासोपारा पूर्वेच्या विजय नगर येथील एका घरात शॉर्ट सर्किटने टीव्ही जळाल्याची ( TV explosion in Nalasopara) घटना समोर आली आहे. या घटनेत ८ वर्षीय मुलाचे प्राण वाचवण्यात यश आले. नालासोपारा पूर्वेच्या विजय नगर परिसरातील शिवधाम बिल्डींग मध्ये भाडे तत्वावर गोविंद विश्वकर्मा हे आपल्या कुटुंबासह राहतात. आज १२.३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी आपल्या ८ वर्षीय मुलाला घरात लॉक करून बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्यांचा मुलगा मोबाईलवर खेळत होता.
हेही वाचा - Nilesh Rane : दीपक केसरकरांनी आपल्या औकातीत रहावं, अन्यथा...; निलेश राणेंचा थेट इशारा
प्रसंगावधन दाखवत घराचे कुलूप तोडले - मात्र, टीव्हीचे कनेक्शन सुरू असल्याने त्यांच्या टिव्हीत अचानक शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला. घरातील मुलाने खिडकीतून आरडा ओरड करून रहिवाशांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी प्रसंगावधन दाखवत घराचे कुलूप तोडले व मुलाची सुटका केली. या घटनेत टीव्ही, घरातील वायरिंगचे मोठे नुकसान झाले आहे.पोलिस, अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहचून या घटनेची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.
हेही वाचा - Nilesh Rane : दीपक केसरकरांनी आपल्या औकातीत रहावं, अन्यथा...; निलेश राणेंचा थेट इशारा