ETV Bharat / city

काँग्रेसची नरमाईची भूमिका.. स्थानिक संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी सरकारने एकत्र लढावे, या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी समर्थन दिले. त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा छातीठोकपणे दावा करणाऱ्या काँग्रेसने आता नरमाईची भूमिका घेतली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

v
v
author img

By

Published : Jul 9, 2021, 7:26 PM IST

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी सरकारने एकत्र लढावे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राऊत यांच्या विधानाची री ओढली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका वगळता राज्यात एकत्र यायला हरकत नाही, असे विधान जगताप यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले. त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा छातीठोकपणे दावा करणाऱ्या काँग्रेसने आता नरमाईची भूमिका घेतली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

आगामी निवडणुकामध्ये मविआ एकत्र येणार -

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महविकास आघाडी म्हणूनच सामोरे जावे, राज्यभरात सर्व महापालिकांमध्ये निवडणुकीसाठी आघाडी व्हावी, अशी इच्छा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जगताप यांनीही राऊत यांच्या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले की, संजय राऊत शिवसेनेचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांचे मोठे महत्त्व आहे. मात्र मुंबईच्या बाबतीत काँग्रेस पक्ष २२७ जागा लढणार असल्याचे आधीच स्पष्ट केले. तसा नियोजन अहवाल काँग्रेसच्या समितीने तयार केला असून येत्या १५ दिवसांत काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना ठराव पाठवला जाईल. परंतु, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच मुंबई असे होत नाही. राज्यात २७ ते २८ नगरपालिका आहेत. येथील जिल्हा परिषदांमध्ये परिस्थिती विचारात घेऊन महाविकास आघाडी एकत्र येण्याबाबत विचार करू. भाजपच्या विरोधासाठीच राज्यात महाविकास आघाडी सरकार बनले आहे. परंतु, मुंबईत स्वबळावर आम्ही ठाम असून राज्यातील परिस्थितीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निर्णय घेतील, असे जगताप म्हणाले.

स्वबळाचा नारा पडणार का मागे?

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि सत्ताधारी असा वाद रंगला आहे. तीन चाकी हे सरकार टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून वारंवार करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक अंतर्गत मदभेद चव्हाट्यावर आले. आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. मात्र काँग्रेसचा स्वबळाचा नारा आता मागे पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.