ETV Bharat / city

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' : मुंबईत ७ लाख घरांमधील २४ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण

author img

By

Published : Oct 2, 2020, 6:39 PM IST

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सुमारे ३५ लाख घरांपैकी १९.८३ टक्के अर्थात ७ लाखांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर, लोकसंख्येचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येपैकी १७.२३ टक्के लोकसंख्येचे म्हणजेच २४ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचे पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात आले.

आरोग्य सर्वेक्षण
आरोग्य सर्वेक्षण

मुंबई - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहीमे अंतर्गत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सुमारे ३५ लाख घरांपैकी १९.८३ टक्के अर्थात ७ लाखांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर लोकसंख्येचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येपैकी १७.२३ टक्के लोकसंख्येचे म्हणजेच २४ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचे पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे. १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान या मोहिमेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांची चमू प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहे. यामध्ये वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यासारख्या सहव्याधींची माहिती घेण्यासह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व ऑक्सिजन पातळी देखील नोंदवून घेण्यात येत आहे. त्याचबरोबर कोविडला प्रतिबंध करण्यासाठी कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोणकोणत्या उपाययोजना आपापल्या स्तरावर अंमलात आणाव्यात, याचीही माहिती घरोघर जाऊन देण्यात येत आहे. तसेच ही माहिती सहजसोप्या भाषेत देणारे एक पत्रक देखील प्रत्येक घरी देण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ३५ लाख ४१ हजार ७७५ घरे असून यामध्ये १ कोटी ४२ लाख १७ हजार १५८ मुंबईकर वास्तव्यास आहेत. या सर्व व घरांचे आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सर्वेक्षण दोन वेळा करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनेक चमू तयार करण्यात आल्या असून प्रत्येक चमूत ३ स्वयंसेवक कार्यरत आहेत. तर, स्वयंसेवकांची प्रत्येक चमू ही दररोज साधारणपणे ५० कुटुंबीयांचे सर्वेक्षण करीत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील ७ लाख २ हजार ४४७ घरांमधील अर्थात १९.८३ टक्के घरांमधील २४ लाख ४९ हजार १२८ सदस्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सर्व २४ विभागांतील सर्वेक्षणाच्या टक्केवारीचा स्वतंत्रपणे विचार करावयाचा झाल्यास 'बी' विभागाची टक्केवारी सर्वाधिक आहे. या विभागातील ३७.१२ टक्के घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या खालोखाल 'एल' विभागातील ३३.६९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर 'सी' विभागातील २८.६९ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशीही माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.