ETV Bharat / city

XBB Variant: राज्यात आता एक्सबीबी नवा व्हेरियंट; वाचा कशी घ्यावी काळजी

author img

By

Published : Oct 18, 2022, 3:40 PM IST

राज्यात मागील आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण १७.७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे एक्स बीबी हा नवा व्हेरियंट राज्यात आढळला आहे. आतापर्यंत केवळ चार ते पाच रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, हा विषाणू वेगाने पसरत असून आरोग्यावर परिणाम करणारा आहे, अशी माहिती साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. तसेच, हिवाळ्यात नागरिकांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्यात आता एक्सबीबी नवा व्हेरियंट
राज्यात आता एक्सबीबी नवा व्हेरियंट

मुंबई - आटोक्यात आलेल्या कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने तपासणीचा वेग वाढवला आहे. दिवाळी तोंडावर आल्याने रुग्ण वाढीला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. राज्यात सध्या बीए. २. ७५ चे विषाणूचे प्रमाण ९५ टक्क्यांवरुन ७६ टक्क्यापर्यंत खाली आले आहे. मात्र, दोन दिवसांपासून चीनसह अन्य देशांमध्ये आढळून येणाऱ्या एक्सबीबी. या नव्या घातक विषाणूंचा संसर्ग राज्यात दिसून आला आहे. हा विषाणू घातक असून अतिशय वेगाने पसरतो. मानवी आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होत आहेत. याच शिवाय, बीए. २.३. २० आणि बीक्यू. १. हे दोन नवे व्हेरीयंट देखील आढळून आले आहेत. मात्र, एक्स बीबी पेक्षा या विशाणूंचा धोका अतिशय कमी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

आरोग्याची काळजी घ्या - राज्यात एक्सबीबी हा विषाणू आढळून आला आहे. आतापर्यंत केवळ चार रुग्ण सापडले आहेत. हा विषाणू अधिक वेगाने पसरतो. या विषाणूमुळे १७ टक्के वाढतील. आरोग्यावरही याचा परिणाम होईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन साथरोग सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितले. तसेच, दिवाळी सोबतच हिवाळा येणार आहे. थंडीच्या दिवसांत नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असेही डॉ. आवटे म्हणाले.

एक्सबीबीचे विषाणू घातक - जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार हाँगकाँगमध्ये कोविड १९चा सब व्हॅरिएंट एक्सबीबी आढळून आला. या व्हॅरिएंटवर लसीकरणाचा प्रभाव दिसून येत नाही. मानवी प्रतिकार शक्तीलाही मात देत हा व्हॅरिएंट संसर्ग वेगाने पसरत आहे. जागतिक शास्त्रज्ञांच्या मते या व्हरिएंटमुळे अनेक देशांमध्ये परिस्थिती बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, महाराष्ट्रात नव्या व्हॅरिएंटच्या रूग्णांची नोंद झाल्याचे दिसून येत आहे.

अशी आहेत लक्षणे - ताप, गळ्यात खरखर होणे.... अशी घ्या काळजी - साथीचे कोणतेही आजार अंगावर काढू नका. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना, कोविडच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करा. कोविड प्रतिबंधक लस घ्या. अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तिंनी विशेष काळजी घ्या. सर्दी खोकला अशी लक्षणे असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.