ETV Bharat / city

Silver Oak Attack : 'सिल्व्हर ओक'वरील हल्ल्याच्या दिवशी काय घडले? संदीप गोडबोले न्यायालयात म्हणाला...

author img

By

Published : Apr 14, 2022, 7:25 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला ( Sharad Pawar House Silver Oak Attack ) प्रकरणात संदीप गोडबोलेला पोलिसांनी अटक केली ( Sandeep Godbole Arrested Silver Oak Attack ) आहे. न्यायालयात त्याला हजर केले असता 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली ( Court Sandeep Godbole Sent Police Custody ) आहे.

Silver Oak Attack
Silver Oak Attack

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक ( Sharad Pawar House Silver Oak Attack ) या निवासस्थानावर हल्ला केला होता. त्या प्रकरणी आता संदीप गोडबोले याला मुंबई पोलिसांनी नागपूरमधून अटक ( Sandeep Godbole Arrested Silver Oak Attack ) केली आहे. त्याला किला कोर्टात आज हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली ( Court Sandeep Godbole Sent Police Custody ) आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सांगितले की, या प्रकरणातील मुख्य दुआ संदीप गोडबोले आहे. मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते आणि आरोपी आरोपी अभिषेक पाटील या दोघांमधील मधील दुआ आहे. मुख्य आरोपी आणि या आरोपींचे संभाषण पोलिसांना मिळाले आहे. सीसीटीव्ही फूटेजही मिळाले असून, दोन्ही आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करायची असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. संदीप गोडबोले हा एसटी कर्मचारी नसून, सदावर्ते यांच्यासोबत असणारी व्यक्ती आहे. त्याने एलएलएमचे शिक्षण घेतले आहे. वकिलीची सनद घेतली नसल्याचेही समोर आले.

संदीप गोडबोले न्यायालयात काय म्हणाला? - न्यायालय - संदीप गोडबोले आपले कोणी वकील आहेत?

संदीप - नाही, माझ्याकडे वकील करायला पैसे नाहीत

न्यायालय - काही सांगायचे आहे का?

संदीप - त्यादिवशी 7 तारखेला या बैठकीला मी नव्हतो. मैदानात जो जल्लोष झाला. त्यानंतर मी माझा मित्र संजय कांबळे अणि मी आमदार निवासला परत गेलो. सकाळी 11.30 वाजता आलो होतो. सकाळी मला सांगितले की, हाजीअली येथे भेटायचे ठरले आहे. सिल्व्हर ओक येथे जायचे ठरले होते. सदावर्ते यांनी फोन केला व्हॉट्स अॅप कॉल केला. तेव्हा मी बोललो की मी पेट्रोलपंप जवळ आहे. 30-35 महिला आहेत. त्यांवर सदावर्ते बोलले की, अभिषेक कुठे आहे? मी बोललो अभिषेक यांना यायला वेळ आहे. तेव्हा सदावर्ते बोलले की, ठीक आहे शांत रहा. 12 तारखे वरती लक्ष द्या.

सरकारी वकील प्रदीप घरत प्रसारमाध्यमांशी बोलताना

एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक - विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी पोलिसांच्या बाजूने युक्तीवाद केला. सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण आता आर्थिक घोटाळ्याच्या दिशेने जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून जवळपास 2 कोटी रुपये गोळा केले गेले. नागपूरवरुन फोन केला गेला ती व्यक्ती हीच, संदीप गोडबोले. संदीप हा व्हॉट्सअॅप कॉलवरुन सदावर्ते यांच्या संपर्कात होता. संदीपनेच पत्रकार पाठवा, असा मॅसेज सदावर्तेंना केला होता. संदीप हाच हल्ल्याचं नेतृत्व करत होता, असा दावा सरकारी वकील प्रदिप घरत यांनी केला. या दरम्यान आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांचे संभाषण न्यायालयात सादर केले.

हेही वाचा - Chitra Wagh Notice : चित्रा वाघांच्या अडचणीत वाढ; रघुनाथ कुचिकांनी पाठवली 10 कोटींची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.