ETV Bharat / city

महाराष्ट्रात राजकीय दौऱ्यांना उधाण, दौऱ्यातून आरोप प्रत्यारोपांची नेत्यांमध्ये चढाओढ - आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या अद्यापही सुरू आहेत. जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोघांकडून प्रयत्न सुरू आहेत. या दौऱ्यांमधून आपण घेतलेली भूमिका कशी योग्य होती हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय.

महाराष्ट्रात राजकीय दौऱ्यांना उधाण
महाराष्ट्रात राजकीय दौऱ्यांना उधाण
author img

By

Published : Sep 23, 2022, 4:02 PM IST

Updated : Sep 23, 2022, 5:08 PM IST

मुंबई - सत्तांतरानंतर शिवसैनिकांची आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोघांकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी दौऱ्यांच्या माध्यमातून आपली भूमिका कशी योग्य होती हे सांगण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या अद्यापही सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या चाळीस आमदारांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. साध्या आणि सरळ स्वभावाचे असलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचे पाप एकनाथ शिंदे गटाने केले असल्याचा आरोप सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यासहित शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय. तसेच हिंदुत्वाच्या विचारांशी दूर होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना संधान बांधून आहे. शिवसैनिकांना पटलेले नाही आणि म्हणूनच आपण भाजपसोबत नैसर्गिक युती करत असल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र आता दोन्ही गटांकडून आपल्या मुद्द्यावरून जनतेत जाऊन सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्हीकडच्या नेत्यांकडून सध्या यात्रा आणि दौरे केले जात आहेत. या दौऱ्यांमधून आपण घेतलेली भूमिका कशी योग्य होती हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा - आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू - उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने कशाप्रकारे षडयंत्र रचले. शिवसेनेसोबत कशी गद्दारी केली. हे सातत्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आपल्या दौऱ्यातून सांगत आहेत. झालेल्या सत्तांतरानंतर शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे निश्चित केले आहे. निष्ठा यात्रा अशी राज्यभर यात्रा काढणार असून, आतापर्यंत त्यांनी मराठवाडा आणि कोकण दौरा केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनप्रवाह शिवसेनेकडे वळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांच्याकडून केला जातोय. त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता एकनाथ शिंदे गटात भीतीचे वातावरण आहे. विरोधकांनी केलेली गद्दारी ही जनतेला आवडलेली नाही. म्हणूनच या दौऱ्यांच्या माध्यमातून जनता शिवसेनेशी तोडली जात आहे. येणाऱ्या काळात विरोधकांना निवडणुकांच्या माध्यमातून जनता नक्की धडा शिकवेल असे मत शिवसेनेच्या उपनेत्या संजना गाडी यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला जमलेली गर्दी पाहून एकनाथ शिंदे गटांच्या गोटात भीतीचे वातावरण आहे. म्हणूनच दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मैदानावर घेता येऊ नये. यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठीच हा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातोय असा आरोप संजना गाडी यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे लवकरच विदर्भ दौरा करणार - मराठवाडा आणि कोकण दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपला मोर्चा विदर्भाकडे वळवला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून विदर्भ दौरा करतील. सध्या राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. येथे पक्ष बांधणी करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र विदर्भ हा भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो. या गडालाच तुरुंग लावण्याची तयारी आता शिवसेनेकडून केली जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत.

आदित्य यांच्या दौऱ्याला मुख्यमंत्र्यांचे दौऱ्यातून उत्तर - मराठवाड्यात आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या दौऱ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठवाड्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी पैठणमध्ये जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा पक्षापासून कसा दूर केला. शिवसेना केवळ कुटुंबापूर्ती मर्यादित केली. याबाबतचे आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे केवळ काँग्रेसचे विचार मांडत आहेत. हिंदुत्वाच्या विचारांचा त्यांना विसर पडला आहे. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा तिरस्कार आयुष्यभर बाळासाहेब ठाकरे यांनी केला. त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरे जवळ का करत आहेत? असा सवाल या दौऱ्याच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला आहे. म्हणूनच आपण वेगळे होण्याचा निर्णय घेत नैसर्गिक मित्र असलेल्या भारतीय जनता पक्षासोबत युती केली या नैसर्गिक युतीला जनतेचा आणि शिवसैनिकांचा पाठिंबा मिळत असल्याचेही या दौऱ्यातून मुख्यमंत्री सांगत आहे. तसेच हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री लवकरच हिंदू गर्व गर्जना यात्रा सुरू करणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री कल्याण डोंबिवली येथे हिंदू गर्व गर्जना मेळावा देखील घेणार आहेत.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा आणि जळगाव येथे दौरे केले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून सहभागीत आपली भूमिका जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ यांनी केला. तर या सोबतच पुढील महिन्यातही मुख्यमंत्री राज्याच्या इतर भागात दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच खरी शिवसेना आहे, याचा प्रत्यय सर्वांना येईल असे मत शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरेही लवकरच करणार महाराष्ट्राचा दौरा - राज्यामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख देखील लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा असेल. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक ठरले आहे. लवकरच दौऱ्याबाबत माहिती प्रसारित केली जाईल असे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितले आहे.

Last Updated : Sep 23, 2022, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.