ETV Bharat / city

Gauri Khan Birthday : आईच्या वाढदिवशी मुलाची भेट नाहीच; आर्यन खान जेलमध्ये क्वारंटाईन

आज आर्यनची आई गौरी खान हिचा वाढदिवस आहे. आर्यनला आज कोर्टाने जामीन नाकारल्याने वाढदिवशीच आई आणि मुलाची भेट होणार नाही.

file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Oct 8, 2021, 7:37 PM IST

मुंबई - मुंबई ते गोवा जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने शनिवारी रात्री छापा टाकला होता. यात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यांना काल(7 ऑक्टोबर) न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर आज आर्थर रॉड जेलमध्ये पाठवण्यात आले. त्याठिकाणी त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, आज आर्यनची आई गौरी खान हिचा वाढदिवस आहे. आर्यनला आज कोर्टाने जामीन नाकारल्याने वाढदिवशीच आई आणि मुलाची भेट होणार नाही.

हेही वाचा - Cruise Drug Case : आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये

  • आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये -

मुंबई ते गोवा जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर ड्रग्स पार्टी प्रकरणी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्यासह आठ जणांना काल, गुरुवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड (किल्ला कोर्ट) यांच्या कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. काल निकाल येईपर्यंत रात्र झाल्याने जेलमध्ये नव्या कैद्याना घेण्याची प्रक्रिया बंद झाल्याने रात्रभर आर्यन आणि इतर आरोपींना एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याची मागणी आर्यनच्या वकिलांनी केली होती. त्याला कोर्टानेही अनुमती दिली होती. आज कोर्टात जामिनावर सुनावणी सुरु असतानाच, एनसीबीने आर्यन खानसह आठ आरोपींना जे जे रुग्णालयात नेऊन त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तर मुनमुन धामेचा व नुपूर सारिका या दोघींना भायखळ्याच्या महिला जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

  • आर्यन खानसह आरोपी जेलमध्ये क्वारंटाईन -

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार आहे. त्या पार्श्वभूमीवर जेलमधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन आरोपींना ३ ते ५ दिवसांसाठी क्वारंटाईन सेलमध्ये ठेवले जाते. आर्थर रोड जेलमध्ये क्वारंटाईन सेल बनवण्यात आला आहे. आर्यन खानसह इतर आरोपींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतरही त्यांना जेलमधील नियमानुसार क्वारंटाईन सेलमध्ये राहावे लागणार आहे.

  • वाढदिवशी आईची भेट नाही -

कालच आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामुळे आज त्याला जामीन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, आज आर्यनला जामीन मिळाला नसल्याने त्याला सत्र न्यायालयातून किंवा उच्च न्यायालयातून जामीन मिळवावा लागणार आहे. तोपर्यंत त्याला आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे. आज आर्यनची आई गौरी खान हिचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी मुलगा घरी येईल अशी अपेक्षा गौरी खानला होती. मात्र, आर्यनला जामीन न मिळाल्याने आजच्या दिवशी आई आणि मुलाची भेट होऊ शकलेली नाही.

  • काय आहे नेमके प्रकरण? -

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना अटक केली होती. काल, ७ ऑक्टोबरला आर्यन खानसह आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार त्यांना आर्थर रोड जेल तसेच भायखळा महिला जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Cruise Drug Case : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.