मुंबई - मुंबईतील तीन मोठ्या कोविड सेंटर रुग्णालयात पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत 1 जूनपर्यंत मुंबईतील बीकेसी, दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटरमध्ये कोरोनाचा कोणताही रुग्ण भरती करून घेतला जाणार नाही. गेल्या वर्षी झालेल्या पावसात या कोविड सेंटरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा धडा घेत पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इनोव्हाचा भीषण अपघात; दोन ठार, दोन जखमी
मुंबईत पाऊस दाखल होण्यासाठी अजून सुमारे 2 आठवडे शिल्लक आहेत. कोरोनाची तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे पाहता मुंबईतील तीन सर्वात मोठ्या जंबो कोविड सेंटरमध्ये पावसाळ्यापूर्वी बीएमसीने सर्व तयारी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. या कोविड सेंटरमध्ये सर्व दुरुस्तीचे कामही सुरू झाले आहे.पालिकेच्या म्हणण्यानुसार, दुरुस्तीच्या कामांमुळे या सेंटरमधील बहुतांश रुग्ण इतर रुग्णालयात हलवण्यात आले असून, नवीन रुग्णांची भरतीही १ जूननंतर होणार असून, तोपर्यंत नवीन रुग्ण भरती केला जाणार नसल्याचे पालिकेने सांगितले आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस आणि माझी कोणतीही गुप्त बैठक झाली नाही; उदय सामंतांचे स्पष्टीकरण