ETV Bharat / city

मुंबईत लसींचा साठा आला, ६२ खासगी रुग्णालयांत आजपासून लसीकरण सुरू

author img

By

Published : Apr 12, 2021, 10:01 AM IST

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेसह ४९ सरकारी, तर ७१ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू होते. दिवसाला ४० ते ६० हजार लसीकरण केले जात असल्याने लसींचा तुटवडा जाणवू लागला. अनेक लसीकरण केंद्र बंद पडली.

मुंबईत लसीचा साठा आला
मुंबईत लसीचा साठा आला

मुंबई - मुंबईत लसींचा तुटवडा असल्याने खासगी रुग्णालयात लसीकरण १० ते १२ एप्रिल बंद ठेवण्यात आले होते. पालिकेकडे लसींचा साठा आला असल्याने आजपासून पुन्हा ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांत लसीकरण सुरू करण्यात आले आहेत. पालिका, सरकारीसह आजपासून पुन्हा खासगी रुग्णालयांतही लसीकरण करून घेता येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लसींचा तुटवडा -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेसह ४९ सरकारी, तर ७१ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू होते. दिवसाला ४० ते ६० हजार लसीकरण केले जात असल्याने लसींचा तुटवडा जाणवू लागला. अनेक लसीकरण केंद्र बंद पडली. यामुळे पालिकेने खासगी रुग्णालयांत १० ते १२ या दरम्यान लसीकरण बंद ठेवण्यात आले. लस आली तर पुन्हा ही केंद्र सुरू करू असे पालिकेने जाहिर केले होते.

पुन्हा लसीकरण सुरू -
शुक्रवार ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री उशिरा ९९ हजार लसी आणि शनिवार, १० एप्रिल २०२१ रोजी १ लाख ३४ हजार ९७० अश्या एकूण २ लाख ३३ हजार ९७० लसींचा साठा महापालिकेला उपलब्ध झाला आहे. त्यातून खासगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रांसाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे आज सोमवारपासून ७१ पैकी ६२ खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे असे पालिकेने कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.