ETV Bharat / city

वेदांत प्रकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे लॉलिपॉप आंदोलन, विरोधकांचे आरोप बिनबुडाचे भाजपची स्पष्टोक्ती, वेदांतवरुन राजकीय धुळवड सुरूच

author img

By

Published : Sep 15, 2022, 6:54 PM IST

वेदांतचा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याने राज्यात आजही राजकीय धुळवड सुरू होती. यामध्ये राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले (NCPs lollipop protest over Vedanta). तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे सरकारला याबाबत जबाबदार धरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर भाजपने वेदांत संदर्भात होत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे (BJPs says oppositions allegations are baseless).

वेदांत प्रकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे लॉलिपॉप आंदोलन

मुंबई - वेदांता प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आज राष्ट्रवादीकडून मुंबई आणि पुण्यात लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले (NCPs lollipop protest over Vedanta). यात राज्य सरकारविरोधात जोरदार निषेधही व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको होतं. हे दुर्दैवी आहे. ठाकरे सरकारवर याचं खापर फोडणं अयोग्य आहे. मंत्री आता सांगतायत की, आम्ही यापेक्षा मोठा प्रकल्प आणू. हे अत्यंत बालिशपणाचं लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार - या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, हा प्रकल्प जर आत्ता गुजरातला गेला आहे. तर मग कशाला चर्चा करायची. हा प्रकल्प तळेगांव येथे येणार होता. यावर त्याची चर्चा देखील झाली होती. राज्य सरकारने यासाठी आवश्यक पूर्तता देखील केली होती. पण आज हा प्रकल्प राज्यातून गेला आहे, त्यामुळे यावर चर्चा करू नये. असं यावेळी पवार म्हणाले.

महाराष्ट्राचं प्रचंड आर्थिक नुकसान - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे NCP MP Supriya Sule यांनी पुण्यात आंदोलन केले. त्यावेळी त्या म्हणाल्या वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात होणार नाही ही खूप दुर्दैवी बाब आहे. एखाद्या राज्याला प्रोजेक्ट मिळत असेल, तर चांगली गोष्ट आहे. पण हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येण्यासाठी ठरलं होत. अस काय झालं की हा प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात गेला. यामुळे महाराष्ट्राचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. यामुळे लाखो नोकऱ्या हे दुसऱ्या राज्यात गेल्या आहे. हा राजकीय विषय न करता एक्स्पर्ट यांना बोलावून महाराष्ट्राची अस्मिता, तरुणांचं रोजगार यांना वंचित ठेवू नका, असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सरकारने दोन मुख्यमंत्री घ्यावे माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे. की त्यांनी सगळ्या मंडळांमध्ये जावं, सगळे सण उत्सव साजरे करावे. माझं म्हणणं आहे, की राज्यात एक सिरीयस, फोकस, मुख्यमंत्र्यांची गरज आहे. वेळ पडली तर या सरकारने दोन मुख्यमंत्री घ्यावे. एकाने यात्रेवर जाव, आणि एकाने राज्य चालवावे. कारण आत्ता जे नुकसान राज्याचं झाल आहे, ते परत होऊ नये, असे देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

प्रकल्प गुजरातला पळवले - वेदांत प्रकल्प नेण्यासाठी कर्नाटक आणि तेलंगणाचा समावेश होता, गुजरातचा नव्हता. मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत वक्तव्य होते की, वेदांता आपल्याकडे येत आहे, परंतु प्रकल्प गुजरातला पळवले जात आहे. यामुळे 1 लाख युवकांना रोजगार मिळाला असता. सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, दिल्लीच्या बादशहाच्या नेतृत्वात हे सरकार काम करत आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.

पंतप्रधानांचा गैर पध्दतीने हस्तक्षेप - वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हुकूमशाही पध्दतीने गुजरातला हलविण्यात आला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केला. मुंबईचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढविण्यासाठी पंतप्रधानांचा गैर पध्दतीने हस्तक्षेप यामध्ये झाला तसेच कंपनीवर दबाव आणत प्रकल्प गुजरातला नेला आहे. यामुळे डबल इंजिन सरकारची राज्याला जबर किंमत मोजावी लागणार असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला मोठ्या रकमेचे अनुदान मिळणार आहे. मात्र, अचानक चक्रे फिरली आणि गुजरात राज्यात प्रकल्प जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. पंतप्रधानांनी गैर पध्दतीने हस्तक्षेप करत कंपनीवर दबाव आणून हा प्रकल्प गुजरातला नेल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांचीही टीका - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल मत व्यक्त केलं (Prakash Ambedkar on Vedanta Foxconn project)आहे. ते म्हणाले की हा जो प्रकल्प गुजरातला गेला आहे त्याला दोन्ही सरकार जबाबदार आहे. नवीन प्रकल्प येईल असे आश्वासन देण्यात आले असे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र हा प्रकल्प गेला तो गेलाच ना, हेही तितकेच खरे असल्याचे आंबेडकर म्हणाले.

युवासेनेची निषेध-स्वाक्षरी मोहीम - कोल्हापुरात शिंदे सरकार विरोधात युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात ( Kolhapur Yuva Sena protest ) आले. युवासेनेची निषेध-स्वाक्षरी मोहीम वेदांत आणि फॉक्सकॉन चा महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प हा शिंदे-भाजपा सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला. दीड लाख कोटीच्या आसपासची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प होता. यामुळे १ लाखाच्यावर तरुणांचा रोजगार जाऊन महाराष्ट्रातील युवा वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे, असे म्हणत कोल्हापुरात शिंदे सरकार विरोधात युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी गुजरात मध्ये गेलेला प्रकल्प पून्हा महाराष्ट्रात यावा यासाठी आज निषेध - स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली.

आरोप अतिशय तर्कशून्य बिनबुडाचे- दुसरीकडे फॉक्सकॉनची गुंतवणूक जरी आता गुजरातमध्ये गेली असली तरी वेदांता समूहाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते महाराष्ट्रात देखील गुंतवणूक करणार आहेत. तसेच, वेदांता - फॉक्सकॉनबद्दल विरोधकांचे आरोप अतिशय तर्कशून्य बिनबुडाचे असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे (BJPs says oppositions allegations are baseless). विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनोचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. तो गुजरातमध्ये गेला. तेव्हा आम्ही राजकारण केलं नाही. शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्याच्या औद्योगिक विकासासाठी धोरणं आखली जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.