ETV Bharat / city

कोरोना काळातही यूलु ई बाईकचा बीकेसीत रोज 300 प्रवाशांकडून वापर

author img

By

Published : Sep 23, 2020, 5:16 PM IST

सार्वजनिक वाहतूक सेवा वापरताना कोरोनाच्या संसर्गाची भीती असते. अशा परिस्थितीत युलू कंपनीच्या मदतीने एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुलात दिलेला युलू ई बाईकचा पर्याय प्रवाशांना उपयुक्त ठरत आहे.

यूलु ई बाईक
यूलु ई बाईक

मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) बंगळुरूस्थित युलू कंपनीच्या माध्यमातून युलू ई बाईक सेवा सुरू केली आहे. या सेवेला सुरुवात होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. या सेवेला कोरोना काळातही चांगला प्रतिसाद मिळाल्याचा युलू कंपनीने दावा केला आहे. युलू कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दिवसाला सरासरी 300 प्रवासी या ई बाईकचा वापर करत आहेत.

टाळेबंदीचे नियम शिथील करूनही बीकेसीतील कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. मात्र, तरीही 300 प्रवासी युलू बाईकचा वापर करत असल्याने ही समाधानकारक बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

एमएमआरडीएचा आहे हा प्रयोग-
आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून बीकेसीचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएकडून सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात आहेत. अशावेळी बीकेसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने युलू ई बाईक सेवा 31 ऑगस्टपासून सुरू केली आहे. ही बाईक इलेक्ट्रिकवर चालणारी असल्याने प्रदूषण होत नाही. तर अशा 120 युलू बाईक कंपनीने उपलब्ध करून बीकेसीतील 11 युलू झोनवर ठेवल्या आहेत. या बाईक प्रवाशांना भाड्याने दिल्या जातात. वांद्रे रेल्वे स्थानक पूर्व ते एलबीए रोडवरील मिठी नाल्यापर्यंत तसेच बीकेसीत अंतर्गत या बाईकने प्रवास करता येतो.

प्रवाशांना युलूचे अॅप डाऊनलोड करत पुढची प्रक्रिया पूर्ण करत ही बाईक भाड्याने वापरता येते. त्यासाठी आधी 5 रुपये आणि त्यानंतर प्रति मिनिट दीड रुपया शुल्क आकारले जाते. त्यानुसार वांद्रे पूर्व स्थानकावरून एमएमआरडीए कार्यालय वा कौटुंबिक न्यायालयापर्यंत पोहचण्यासाठी 12 ते 15 रुपये लागतात. रिक्षासाठी 20 रुपये तर बेस्ट बससाठी 5 आणि 10 (विशेष बस) रुपये मोजावे लागतात.

प्रवाशांना चांगला पर्याय-

कोरोना काळात गर्दीत किंवा रिक्षात प्रवास करण्यापेक्षा एकटे ई बाईकने प्रवास करण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कोरोना काळातही दिवसाला सरासरी 300 प्रवासी बाईकचा वापर करत असल्याची माहिती युलू बाईक कंपनीचे सिटी व्यवस्थापक दीपक शर्मा यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. कोरोना काळात अजूनही बीकेसीतील कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. तरीही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर हा प्रतिसाद आणखी वाढेल, असा विश्वास ही शर्मा यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान जसा प्रतिसाद वाढेल तशी भविष्यात बाईकची संख्या आणि युलू झोनची (बाईक स्टॅन्ड) संख्या 11 वरून 22 करण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.