ETV Bharat / city

Mumbai Corona : ...म्हणून नवीन वर्षातही कोरोना मुंबईकरांची पाठ सोडणार नाही!

कोरोना विषाणूचा प्रसार (Coronavirus Spread) पूर्ण थांबणार नसल्याने नवीन वर्षातही मुंबईकरांना कोरोना विषाणूसोबत जगावे लागणार आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी पुढील वर्षीही मुंबईकरांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

corona file photo
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Nov 25, 2021, 10:17 PM IST

मुंबई - जगभरात हाहाकार पसरवणारा कोरोना (Corona) विषाणू गेले पावणे दोन वर्ष मुंबईत ठाण मांडून आहे. कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असला तरी कोरोना पूर्ण गेलेला नाही. कोरोना विषाणूचा प्रसार (Coronavirus Spread) पूर्ण थांबणार नसल्याने नवीन वर्षातही मुंबईकरांना कोरोना विषाणूसोबत जगावे लागणार आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी पुढील वर्षीही मुंबईकरांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

  • मुंबईत कोरोनाचा प्रसार -

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर मुंबईत रुग्ण वाढू लागल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. जून नंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यानंतर कोरोनाचा प्रसार कमी होऊ लागल्यावर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. या वर्षी फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात रोज १० ते ११ हजार रुग्ण आढळून येत होते. मुंबईकरांची साथ आणि पालिका व राज्य सरकारचे प्रयत्न यामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला आहे. सध्या रोज २०० च्या सुमारास रुग्ण आढळून येत आहेत.

  • डिसेंबरनंतर रुग्ण वाढण्याची शक्यता -

मुंबईत येत्या काळात ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी राज्याबाहेरून तसेच परदेशातून पर्यटक येणार आहेत. या पर्यटकांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. यासाठी पालिका पर्यटकांची विमानतळावर चाचणी करणार आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले नसतील त्यांना सात दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे. विमानतळावर रोज ४ हजार चाचण्या केल्या जातात. आतापर्यंत विमानतळावर ३ लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. थर्टी फर्स्टला विशेष करुन पब, बारवर लक्ष असणार आहे. यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात दोन पथकांची गस्त राहणार असून ज्या वॉर्डात पब व बारची संख्या अधिक असेल त्या ठिकाणी पथकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या पब व बारवर पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.

  • पुढील वर्षीही कोरोनासोबत -

जगभरात काही देशात कोरोना विषाणूची तिसरी चौथी तर काही ठिकाणी पाचवी लाट आली आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. मागील वर्षाचा अनुभव पाहता यावर्षी सणांच्या नंतर रुग्णसंख्या वाढेल अशी भीती होती. मात्र रुग्णसंख्या आटोक्यात आहे. डिसेंबरमध्ये ख्रिसमस आणि थर्टीफर्स्ट साजरा केल्यानंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिका अलर्टवर आहे. मुंबईत बहुतेक सर्व निर्बध शिथिल केले आहेत. त्यामुळे सध्या २०० च्या सुमारास रुग्णसंख्या आढळून येत आहे, तितकीच रुग्णसंख्या पुढील काही महिने अशीच आढळून येईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यामुळे नव्या वर्षीही नागरिकांना कोरोना विषाणू सोबत जगावे लागणार आहे. त्यासाठी नागरिकांनी मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाणे टाळणे या नियमांचे पालन करावे असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.

  • ७ लाख ६१ हजार रुग्ण, १६ हजार मृत्यू -

मुंबईत गेल्या पावणे दोन वर्षात ७ लाख ६१ हजार ७७६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लाख ४० हजार ५४७ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. १६ हजार ३१५ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २५८५ दिवस आहे. मुंबईमधील झोपडपट्टीत रुग्ण आढळून येत नसल्याने एकही झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही. तर एकाच इमारतीमध्ये ५ रुग्ण आढळून आल्याने १२ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.