ETV Bharat / city

Neil Somaiya Anticipatory Bail Application : मुंबई सत्र न्यायालयाने 'या' कारणाने नील सोमैयांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांचे पुत्र भाजप नगरसेवक नील सोमैया यांची अटकपूर्व जामीन ( Neil Somaiya Anticipatory Bail Application ) अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने 1 मार्च रोजी फेटाळून लावला होता. या निर्णयावरील सविस्तर निकाल प्राप्त ( Mumbai Court detailed orders ) झाला असून सत्र न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यामुळे रिकामी (blank) अटकपूर्व जामीन देता येत नाही असे न्या. दीपक भागवत यांनी म्हटले आहे.

Neil Somaiya Anticipatory Bail Application
नील सोमैया
author img

By

Published : Mar 4, 2022, 5:31 PM IST

मुंबई - भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांचे पुत्र भाजप नगरसेवक नील सोमैया यांची अटकपूर्व जामीन ( Neil Somaiya Anticipatory Bail Application ) अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने 1 मार्च रोजी फेटाळून लावला होता. या निर्णयावरील सविस्तर निकाल प्राप्त ( Mumbai Court detailed orders ) झाला असून सत्र न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यामुळे रिकामी (blank) अटकपूर्व जामीन देता येत नाही असे न्या. दीपक भागवत यांनी म्हटले आहे.

'म्हणून' फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज -

नील सोमैया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करताना मुंबई सत्र न्यायालयाने आपल्या विस्तृत आदेशात असे म्हटले आहे कि, राकेश वाधवान सोबत जमीन डील प्रकरणात जे आरोप आहेत ते वसईतले आहेत आणि वसई हे मुंबई सत्र न्यायालयाच्या कार्य कक्षेत येत नाही. त्याचबरोबर पीएमसी बँक प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखे व्यतिरिक्त ईडी ही करत आहे आणि ईडीचे सदर न्यायालय हाताळत नाही असे ही अतिरिक्त सत्र न्यायधीश दीपक भागवत यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर न्यायालयाने आपल्या आदेशात असे ही म्हटले आहे कि, या प्रकरणात अजून कुठे गुन्हा दाखल नाही किंवा गुन्ह्याचा स्वरूप काय आहे. कुठल्या व्यावसायिक डीलच्या संदर्भात आरोप आहेत हे ही स्पष्ट नाही. त्यामुळे न्यायालय सरसकट संरक्षण देऊ शकत नाही. म्हणून कोर्टाने वरील निरीक्षण नोंदवत नील सोमैया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

बाप बेटे दोनो जेल जायेंगे - संजय राऊत

विशेष म्हणजे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदमध्ये नील सोमैया यांच्यावर पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाढवणे सोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. ते म्हणाले होते कि, 'बाप बेटे दोनो जेल जायेंगे'. संजय राऊत यांच्या सदर आरोप नंतर नील सोमैया यांना आपल्या अटकेची भीती होती. म्हणून त्यांनी अटक पूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता आणि मागणी केली होती कि अटक करण्याच्या स्थितीमध्ये त्यांना ७२ तासापूर्वी सूचना देण्यात यावी. मात्र वरील निरीक्षण नोंदवत अतिरिक सत्र न्यायधीश दीपक भागवत यांनी नील सोमैया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

म्हणून केला होता अटकपूर्व जामीन अर्ज -

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात दररोज नवनवे घोटाळ्यांचा बाहेर काढण्याचा सपाटाच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैयांनी सुरू केला होता. त्या विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बाप बेटे जेल जाएंगे असा नारा देत किरीट सोमैयां यांच्या मुलाने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत जमीन खरेदी केल्याचा दावाही केला होता. हा व्यवहार नीलच्या मालकीच्या निकॉन इन्फ्राच्या माध्यमातून झाला असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अन्य एका प्रकरणात नीलला पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यातही बोलावले होते. त्यामुळे आपल्याविरोधात एफआयआर दाखल होण्याआधीच नीलने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

संजय राऊत काय म्हणाले होते?

निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे? ही कंपनी किरीट सोमैयांची आहे. त्यांच्या कुटुंबियांशी आहे. त्यांचा मुलगा नील सोमैयांची आहे, जो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प त्यांनी मौजे गोखीवरे ता. वसई येथे उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमैयांनी ब्लॅकमेल केले. वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमिन फ्रंटमॅन आहे, लाढानी म्हणून त्याच्या नावावर घेतली तसेच पैसेही घेतले. ती रक्कम 80 ते 100 कोटी रुपयांच्या घरात आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी सोमैयांवर केला होता.

हेही वाचा - Anil Parab On ST Worker Strike : "एसटी कर्माचाऱ्यांना ही शेवटची संधी, अन्यथा..." अनिल परबांना केले आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.