ETV Bharat / city

ACB Arrested BMC Officer : पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले

लाच घेताना पालिकेच्या भाडे संकलक व त्याच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Anti Corruption Bureau ) रंगेहात अटक केली आहे. हा प्रकार ताजा असतानाच हॉटेलचे लायसन्स हस्तांतरित करण्यास पैशांची मागणी करणाऱ्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( health officer ) व त्यांच्या साथीदाराला लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.

प्रातिनिधीक चित्र
प्रातिनिधीक चित्र
author img

By

Published : Apr 7, 2022, 4:05 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या ( BMC ) के पूर्व कार्यालयात असलेल्या भाडे संकलक व त्यांच्या सहकाऱ्याने एका व्यक्तीची दुकाने पालिकेकडे एनेक्चर -२ नोंद करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली. ही लाच घेताना पालिकेच्या भाडे संकलक व त्याच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Anti Corruption Bureau ) रंगेहात अटक केली आहे. हा प्रकार ताजा असतानाच हॉटेलचे लायसन्स हस्तांतरित करण्यास पैशांची मागणी करणाऱ्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( health officer ) व त्यांच्या साथीदाराला लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.

आधीही घेतले होते ४० हजार : एका व्यक्तीचा हॉटेल व्यवसाय आहे. सदर हॉटेल सन २०१८ साली सदर व्यक्तीने विकत घेतले. हॉटेल विकत घेतले तरी पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेले लायसन्स जुन्या मालकाच्या नावे होते. यामुळे नवीन मालकाला हेल्थ लायसन्स स्वतःच्या नावावर हस्तांतरीत करणे, हॉटेलचे डिझेल इंधन आधारीत भट्टीचे एल.पी.जी.मध्ये रुपांतर करणे, पत्त्यामध्ये पिन कोड दुरुस्त करणे याकरिता अडचणी येत होत्या. यासाठी पालिकेच्या बी वॉर्ड येथे संबंधित व्यक्तीने अर्ज केला होता. त्यावर आरोग्य अधिकारी असलेल्या संदिप गायकवाड यांनी त्या व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामधील ४० हजार गायकवाड यांना देण्यात आले.

लाच घेताना रंगेहात पकडले : अग्निशमन प्रमाणपत्रासाठी व पिन कोड बदली करण्यासाठी पुन्हा ३ हजार रुपये मागण्यात आले. तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयात तक्रार केली. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराला पैसे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खासगी व्यक्ती सचिन महादेव कोकितकर यांना ३ हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आरोग्य अधिकारी असलेल्या संदिप गायकवाड व सचिन कोकितकर या खासगी व्यक्ती विरूध्द गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे.

हेही वाचा - Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.