ETV Bharat / city

Maharashtra political crisis : पोलीस ठाण्यांना हायअलर्टवर राहण्याचे मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश

author img

By

Published : Jun 26, 2022, 8:28 AM IST

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्या नंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे गटातील बंडखोर ( Mumbai cp instruct all police stations ) आमदारांच्या कार्यालयांवर संतप्त शिवसैनिकांकडून ( Maharashtra political crisis mumbai cp instructions ) तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

mumbai cp instruct all police stations
मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्या नंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे गटातील बंडखोर ( Mumbai cp instruct all police stations ) आमदारांच्या कार्यालयांवर संतप्त शिवसैनिकांकडून ( Maharashtra political crisis mumbai cp instructions ) तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शनिवारी मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्तांची बैठक घेतली. त्यावेळी निर्देश देण्यात आले.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : आमदार पळविण्यात भष्ट्राचार झाला; निर्मला सीतारमन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका

बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार यांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय व्यक्तीसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याबाबत सांगण्यात आले. विशेष शाखेने सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबंधितांना आवश्यक माहिती त्वरीत देण्यास सांगितले.

कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही, याबाबत आवश्यक सूचना बैठकीत दिल्या. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले. आवश्यक प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी सजग राहून कर्तव्य करणे अपेक्षित आहे. या सूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना देण्याबाबत सांगण्यात आले. मुंबई शहरात कलम 144 आरपीसी हे प्रतिबंधात्मक आदेश 10 जुलै पर्यंत पाळले जातील याबाबत सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा - Eknath Shinde : 'मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठी लढतोय'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.