मुंबई - राज्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर ( MPSC schedule announced for 2022-23 ) केले आहे. यामुळे आता स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.

स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा 2019 परीक्षा 413 पदासाठी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल 19 जून 2020 रोजी लागून, वर्ष होत आले. तरी राज्य सरकार व उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार तसेच अशा महत्त्वाच्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे एमपीएससीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड नाराजी होती. त्यातच पुण्यात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने शासनाचे वेळखाऊ धोरणामुळे आत्महत्या केली आणि त्यामुळे एमपीएससी भरतीचा मुद्दा पुढे आलेला होता. या रखडलेल्या भरती प्रक्रियांमुळे विद्यार्थ्यांने राज्यभरात आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. मात्र, आता या घटनेतून बोध घेत अखेर एमपीएससी आणि राज्य सरकारने एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या रिक्त जागांसंदर्भातील परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. या परीक्षा जानेवारी २०२२ पासून ते एप्रिल २०२३ पर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करणे शक्य होणार आहे.

असे आहे वेळापत्रक ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आज स्पर्धा परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, ऑक्टोंबर महिन्यात प्रसिध्द केलेल्या जाहिरातीतील पदांसाठीची परिक्षा २ जानेवारी २०२२ रोजी पहिली राज्य सेवा परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ वर्गातील रिक्त जागांसाठी दिलेल्या जाहीरातील पदांसाठीची परिक्षा ही १२ मार्च रोजी होणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २६ फ्रेबुवारी २०२२ ला होणार आहे. तसेच डिसंबर २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या ४ जाहिरांतीतील रिक्त पदांसाठीची परिक्षा मार्च आणि एप्रिल महिन्यात होणार आहे. तर एप्रिल, मार्च आणि जून २०२२ मध्ये प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीतील रिक्त पदांसाठीची परिक्षा जून, ऑगस्ट, ऑक्टोंबर २०२२ मध्ये होणार आहे.
हेही वाचा - MPSC : एमपीएससीच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर