ETV Bharat / city

'वर्तमानपत्रामुळे आमच्या भाषा सुधारल्या, लिखाण आणि शब्दांना लगाम लावू नका'

author img

By

Published : Oct 24, 2020, 9:00 PM IST

Updated : Oct 24, 2020, 10:45 PM IST

वर्तमानपत्रामुळे आमच्या भाषा सुधारल्या आहेत, त्याबद्दल लेखक-पत्रकारांचे आभार मानत लिखाण आणि शब्दांना लगाम लावू नका, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

ambrish mishra book launch
पुस्तक प्रकाशन सोहळा

मुंबई - वर्तमानपत्रामुळे आमच्या भाषा सुधारल्या आहेत, त्याबद्दल लेखक-पत्रकारांचे आभार मानत लिखाण आणि शब्दांना लगाम लावू नका, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. वर्तमानपत्रात करण्यात येणाऱ्या बोल्ड अक्षारांवरून त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे - खासदार, राष्ट्रवादी

सुप्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार अंबरीश मिश्र लिखित, राजहंस प्रकाशन प्रकाशित "चौकात उधळली मोती" एक अक्षरासोहळा यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार, शरद काळे यांच्या उपस्थित हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.

वर्तमानपत्र आणि पुस्तक वाचल्याने आमच्या भाषा सुधारल्या - सुळे

या प्रकाशनावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी बोलताना, आमच्या घरात दीड तास वर्तमानपत्र वाचण्यात जातात. वर्तमानपत्र आणि पुस्तक वाचल्याने आमच्या भाषा सुधारल्या. त्यामुळे मी लेखक, पत्रकारांचे आभार मानते, असे सुळे म्हणाल्या. आजकाल वर्तमानपत्रात काही अक्षरे आणि लाईनी बोल्ड केल्या जातात, तसे करू नका, लिखाण आणि शब्दांना लगाम लावू नका असे त्या म्हणाल्या. लॉकडाऊनमध्ये वृत्तपत्र बंद झाली. त्यावेळी मी अनेकांची बोलणीही खाल्ल्याचे सुळे यांनी सांगितले. त्यामुळे वृत्तपत्रे बंद होता कामा नयेत, असे सुळे म्हणाल्या. संजय राऊत लिहितात ते मला आता आवडायला लागले असल्याने ते मी रोज वाचते, असे सुळे म्हणाल्या.

संजय राऊत यांचे लिखाण उधळलेले असते - लेखक अंबरीश मिश्र

संजय राऊत जे लिहितात ते मला खूप आवडते. त्यांचे लिखाण उधळलेले असते, असे लेखक अंबरीश मिश्र म्हणाले. यावर बोलताना आम्ही नेहमीच उधळलेलेच असतो, आमची ओबडधोबड मराठी आणि हिंदी घेऊनच दिल्लीत काम करतो. तिकडे असेच चालते असे संजय राऊत म्हणाले. पुस्तक आणि आपली माणसं दिसल्याने आज खऱ्या अर्थाने लॉकडाऊन उठल्यासारखे वाटत आहे, असे राऊत म्हणाले.

'चौकात उधळले मोदी'

आम्ही उधळलेले असतो, हे ऐकून पुस्तकाचे नाव "चौकात उधळले मोदी" असे मला वाटले, अस आशिष शेलार म्हणाले. दीपस्तंभ म्हणून अंबरीशसारखे पत्रकार पाठीशी उभे असतात त्याबद्दल त्यांनी लेखकाचे आभार मानले. शेलार यांनी यावेळी एक शेरही रसिकांना ऐकवला.

शरद पवारांचा संदेश -

पुस्तक प्रकाशनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमाने संदेश दिला. या संदेशात अंबरीश मिश्र यांनी अनेक शेरोशायरी लिहिल्या, अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी "चौकात उधळली मोती" हे पुस्तक लिहिले आहे, त्याला चांगल्या प्रकारे विक्री व्हावी, असे पवार यांनी म्हटले आहे.

Last Updated : Oct 24, 2020, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.