ETV Bharat / city

अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार रद्द आदित्य ठाकरे यांचे ट्वीटमधून संकेत

author img

By

Published : Jun 1, 2020, 1:39 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‍अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याचे, एक ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट जारी करून या परीक्षा रद्द होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या ट्वीटमुळे राज्यातील सुमारे आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन या परीक्षेच्या संदर्भात पयार्यांची पडताळणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

Mumbai
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई - राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा या रद्द केल्या जाणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‍अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याचे, एक ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट जारी करून या परीक्षा रद्द होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटमुळे राज्य सरकारकडून अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात कोणत्याही क्षणी निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

Mumbai
आदित्य ठाकरे यांचे ट्वीट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी दिलासा दिला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या बॅचला सरासरी गुणांवर उत्तीर्ण करा, तसेच ज्या विद्यार्थ्यांना वाटते की, त्यांचे सरासरी गुणांमुळे नुकसान होत आहे, ते नंतर ठरलेल्या परीक्षेसाठी स्वेच्छेने उपस्थित राहू शकतील असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

या ट्वीटमुळे राज्यातील सुमारे आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन या परीक्षेच्या संदर्भात पयार्यांची पडताळणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. तर या परीक्षेसाठीचा निर्णय घेताना कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात आपण सापडू नये, यासाठी आपण कायदेशीर सल्ला घेऊन दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटमुळे राज्यातील विद्यापीठ आणि त्या अंतर्गत असलेल्या परीक्षा या रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.