मुंबई - आषाढी आणि कार्तिकीला पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात येते. पंढरपुरात जाऊ न शकणारे विठ्ठल भक्त आहे त्या ठिकाणी दिंड्या काढून विठू नामाचा गजर करतात. आज आषाढी एकादशी निमित्त ठाणे ते सीएसएमटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिंडी काढत विठू नामाचा गजर केला.
आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये भक्तांचा जनसागर लोटला आहे. हरिनामाच्या गजरात अवघी पंढरी न्हाऊन निघाली आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तिरावर स्नानासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र, त्या ठिकाणी पोहचू न शकणारे भक्त आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी दिंडी काढून विठ्ठलाचा गजर करत दिंडी काढतात.
मुंबईत रेल्वेमध्ये अनेक भजनी मंडळ आहेत. त्यापैकी ठाणे ते सीएसएमटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अशीच एक दिंडी रेल्वेमधून काढली. ठाणे ते सीएसएमटी असा प्रवास करत ही दिंडी सीएसएमटी स्थानकात आली. त्या ठिकाणी ताल मृदूंगाच्या स्वरात विठू नामाचा गजर केला. गेले सात वर्ष ही दिंडी काढली जाते. रेल्वे प्रशासनाकडून अशा दिंड्या काढायला परवाणगी नसते, मात्र त्यांनी परवानगी दिली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे आयोजकांनाही आभार मानले आहेत.