मुंबई - सर्वोच्च न्यायालयातील शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांचा वाद सर्वोच्च न्यायालयमध्ये पोहोचला आहे आणि सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो लोकशाहीची दिशा ठरवणारा असेल या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटत आहेत मात्र आता साहित्यिक लेखक आणि कवी कवयित्री यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत नीलम ताई गोरे यांच्या पुढाकारात भेट घेतली त्यामुळे राज्यातील साहित्यिक वर्तुळात ह्या घडामोडी बाबत चर्चेला सुरुवात झाली आहे
साहित्यिकांनी दुःख व्यक्त केले हा संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला देशातील जनतेला उत्सुकता आहेच मात्र साहित्यिक वर्तुळातीलसुद्धा अनेक दिग्गज लेखकांना याबद्दल उत्सुकता आहेत त्यामध्ये साहित्यिक अर्जुन डांगळे लेखिका मेधा कुलकर्णी कवी अरुण म्हात्रे कवयित्री नीरजा तसेच डॉक्टर महेश केळुसकर हेमंत करणे रवींद्र पोखरकर आधी अनेक साहित्यिक कवी लेखक यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक केली भेट घेतली ह्या भेटी बाबत नीलम ताई गोऱ्हे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या या अनौपचारिक बैठकीत राज्यातील सध्याच्या दुषित राजकीय परिस्थितीवर या सर्व साहित्यिकांनी दुःख व्यक्त केले
शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोविड काळात केलेले काम आणि त्यांच्या काळात झालेले महाराष्ट्र शासनाचे काम याबद्दल अनेक सकारात्मक बाबी त्यांनी सांगितल्या आहेत अशी माहिती नीलमताई गोऱ्हे विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या यांनी ईटीव्ही सोबत संवाद साधताना दिली येत्या काळात मराठी भाषेच्या संदर्भात तसेच रंगभूमीच्या संदर्भात आणि साहित्य कलेच्या संदर्भात अनेक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित साहित्यिकांना दिले ही माहिती विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना दिली
अभिव्यक्ती स्वातंत्र्य करीता उद्धव ठाकरे आणि साहित्यक यांची भूमिका एकच यासंदर्भात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेश केळकर यांच्याशी ईटीवी ने संवाद साधला असता ते म्हणाले देशांमध्ये लेखक कवी साहित्यिक यांच्यावर हल्ले झालेत होत आहेत केवळ त्यांच्यावरच नाही तर पत्रकार मंडळी यांच्यावर देखील हल्ले झालेले आहे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे तसेच देशातील सरकारी पण स्वायत्त घटनात्मक संस्थांवर देखील हल्ला होत आहे त्याचप्रमाणे राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांवरच हल्ला होत आहे त्यामुळे यासंदर्भात आम्ही उद्धव ठाकरेंकडे ही भूमिका मांडली असता त्यांनी देखील विशद केले की आमची देखील हीच भूमिका आहे प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदुत्व म्हणजे तुमची आमची भूमिका एक आहे आणि जे बेगडी आणि खोट हिंदुत्व आहे ते देशामध्ये काय करत आहे ते तुम्ही पाहतच आहात असे उद्धव ठाकरे यांनी भेटीत म्हटल्याचेही डॉक्टर केळुसकर यांनी नमूद केले
ह्या भेटीमुळे साहित्यिक मंडळींमध्ये चर्चा या साहित्यिक कवी लेखक यांच्या गटामध्ये डॉक्टर महेश केळकर कवयित्री निर्जा कवी अरुण मात्रे संदेश भंडारे प्राध्यापक महेंद्र भवरे योगीराज बागुल रमेश शिंदे मंदाकिनी पाटील योगिनी राऊळ अमोल नाले विनय शिर्के दिलीप सावंत दीपक कांबळे तसेच अभ्यासू महाराष्ट्र गटाचे स्वाती वैद्य नेहा राणे सविता दामले मनाली गुप्ते मिळाल्याने जोक हेमंत करणे मेधा कुळकर्णी उत्पल व बा तुषार गायकवाड रवींद्र पोखरकर कौस्तुभ खांडेकर आदी साहित्यिक मंडळी उपस्थित होते प्रगतीशील सत्यिक मंडळी शिवसेना पक्ष प्रमुखांना भेटल्याने राज्यातील साहित्यिक वर्तुळात चर्चा तर होणारच कवयित्री प्रज्ञा द्या पवार यांना ह्या भेटी बाबत ईटीव्ही कडून विचारणा केली असता मला परिपूर्ण कल्पना नाही मी घाईत प्रवासात आहे नंतर बोलू अशी प्रतिक्रिया दिली आहे
हेही वाचा - Vinayak Mete passed away विनायक मेटेंच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईतील निवास्थानी राजकीय नेत्यांची गर्दी