ETV Bharat / city

प्रसिद्ध गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार

author img

By

Published : Jan 18, 2021, 2:02 AM IST

Updated : Jan 18, 2021, 3:01 AM IST

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार ए. आर. रहमान यांनीही समाज माध्यमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तब्येत चांगली असताना त्यांचे अचानक निधन झाल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान
उस्ताद गुलाम मुस्तफा खान

मुंबई - पद्मविभूषण आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री सांताक्रुझमध्ये शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे रविवारी राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

वांद्र्यातील घरी उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी रविवारी शेवटचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या स्नुषा नम्रता गुप्ता-खान यांनी दिली. त्यांनी सांगितले की, उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांची सकाळी तब्येत चांगली होती. घरात २४ तास परिचारिका असते. दुपारी मसाज करताना त्यांना उलटी झाली. ताबडतोब मी धाव घेतले, त्यांचे डोळे बंद होते. त्यांचा श्वास संथपणे चालू होता. डॉक्टरांशी संपर्क साधला. पण, ते येण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे नम्रता यांनी सांगितले. तब्येत चांगली असताना त्यांचे अचानक निधन झाल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. ते ३ मार्चला वयाची नव्वदी पूर्ण करणार होते.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना २०१९ मध्ये ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला होता. त्यानंतर शरीराच्या डावा भागाला अर्धांगवायू झाला होता. खान यांच्यावर सांताक्रुझ येथील कब्रस्तानमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार ए. आर. रहमान यांनीही समाज माध्यमात उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

शासकीय इतमामात अंतिमसंस्कार
शासकीय इतमामात अंतिमसंस्कार

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना मिळाला संगीताचा वारसा-

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा उत्तर प्रदेशमधील बडौन येथे ३ मार्च १९३१ ला जन्म झाला. त्यांचे आजोबा हे प्रसिद्ध संगीतकार उस्ताद मुर्रेड बक्ष होते. तर त्यांची आई सब्री बेगम या उस्ताद इनायत हुस्सेन खान यांच्या कन्या आहेत. उस्ताद इनायत यांना रामपूर सहसवान या संगीत घराणाचे संस्थापक मानले जाते. खान यांना वडील उस्ताद वॉरिस हुस्सेन खान यांच्याकडूं शास्त्रीय संगीताचे धडे मिळाले होते. तर चुलत भाऊ उस्ताद निस्सार हिस्सान खान यांच्याकडूनही त्यांनी संगीत शिकले होते.

अनेक पुरस्कारांनी करण्यात आले सन्मानित-

  • उस्ताद गुलाम मुस्तफा खान १९९१ मध्ये संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पद्मश्री मिळाला.
  • तर २००६ मध्ये पद्मभूषण आणि २०१८ मध्ये पद्मविभूषण मिळाला.
  • संगीतामधील सर्वोच्च कामगिरीबद्दल त्यांना २००३ मध्ये संगीत नाटक अकदामी पुरस्कार मिळाला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टीत दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Jan 18, 2021, 3:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.