ETV Bharat / city

Mumbai Best Bus Accident : गेल्या सहा वर्षात बेस्ट बसच्या अपघातात 98 जणांचा मृत्यू, तर...

author img

By

Published : Feb 16, 2022, 5:21 PM IST

गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत बेस्टचे गंभीर अपघात झाले ( Best Bus Accident ). त्यात 98 जणांचा मृत्यू झाला ( Best Bus Accident Death ) आहे. तर 653 जण जखमी झाले ( Best Bus Accident Injured ) आहेत.

Best Bus Accident
Best Bus Accident

मुंबई - मुंबईत रेल्वे आणि बेस्टकडून परिवहन सेवा पुरवली ( Mumbai Best Bus ) जाते. यामुळे रेल्वे आणि बेस्टला लाईफलाईन बोलले जाते. बेस्टकडून परिवहन सेवा देताना अनेकवेळा अपघात होतात. गेल्या ६ वर्षात बेस्टच्या गंभीर अपघातात ९८ जणांचा मृत्यू झाला ( Best Bus Accident Death ) आहे. तर इतर अपघातात ६५३ जण जखमी झाले ( Best Bus Accident Injured ) आहेत.

बेस्टचे अपघात

२ नोव्हेंबर २०२१ रोजी दादर टीटी खोदाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्वीनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिली होती. यामध्ये चालकासह इतर दोन प्रवासी अशा एकूण ३ जणांचा मृत्यू झाला, तर ८ प्रवासी जखमी झालेले. एप्रिल २०१६ ते जानेवारी २०२२ या ६ वर्षांत बेस्ट बसचे ९७ गंभीर अपघात झाले, त्यात ९८ जणांचा मृत्यू झाला. तर बेस्ट बसचे इतर ८७२ अपघात झाले, त्यात ६५३ जण जखमी झाले आहेत. मागील 6 वर्षात अपघात कमी झाल्याची माहिती बेस्टच्या जनसंपर्क विभागाकडून दिली आहे.

गंभीर अपघातात ६ वर्षात ९८ जणांचा मृत्यू

बेस्टचे एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये २१ अपघात झाले, त्यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ मध्ये २१ अपघात झाले, त्यात २१ जणांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये २३ अपघात झाले, त्यात २३ जणांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये १० अपघात झाले, त्यात १० जणांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०२० ते मार्च २०२१ मध्ये १३ अपघात झाले, त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ मध्ये ९ अपघात झाले त्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

इतर अपघातात ६५३ जण जखमी

बेस्टचे १ एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये ३८३ अपघात झाले. या अपघातांत २६५ जण जखमी झाले. १ एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ मध्ये १४२ अपघात झाले, त्यात १३० जण जखमी झाले. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये ११६ अपघात झाले, त्यात ८७ जण जखमी झाले. १ एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये ९१ अपघात झाले, त्यात ६९ जण जखमी झाले. १ एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ मध्ये ७८ अपघात झाले, त्यात ४८ जण जखमी झाले. १ एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ मध्ये ६२ अपघात झाले, त्यात ५४ जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा - सरकारमध्ये काय बदल होतील ते 10 मार्च नंतर दिसेल! पटोलेंचा पुनर्उच्चार, राजकीय वर्तुळात खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.