ETV Bharat / city

एका क्लार्कचा राजीनामा मंजूर करण्याकरता इतकी नाटकं का - किशोरी पेडणेकर

author img

By

Published : Oct 13, 2022, 12:22 PM IST

Updated : Oct 13, 2022, 1:57 PM IST

एका दिवसातही राजीनामा मंजूर केला जाऊ शकतो. महापालिकेचे कुठलेही चुकीचे शेरे ऋतुजा लटकेंच्या नावावर नाहीत. असे असताना एका क्लार्कचा राजीनामा मंजूर करण्याकरता इतकी नाटकं केली जातायेत अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर

मुंबई : अनेकदा निवडणुकीआधी असे राजीनामे दिले जातात. तसेच नियमानुसार पेमेंट किंवा अधिदान चुकते केल्यानंतर एका दिवसातही राजीनामा मंजूर केला जाऊ शकतो. महापालिकेचे कुठलेही चुकीचे शेरे ऋतुजा लटकेंच्या नावावर नाहीत. असे असताना एका क्लार्कचा राजीनामा मंजूर करण्याकरता इतकी नाटकं केली जातायेत अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

ऋतुजा लटकेसुद्धा सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात : दरम्यान ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार (Hearing of Rituja Latkes petition) आहे. ऋतुजा लटके शिवसेना ठाकरे गटाच्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार निश्चित झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने अद्यापही राजीनामामंजूर न केल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकी करिता उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटचा दिवस आहे. ऋतुजा लटकेसुद्धा सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित (Rituja Latkes petition in Bombay High Court) आहेत.

राजीनामा अद्यापही मंजूर नाही - मुंबई उच्च न्यायालयाकडून संबंधित BMC ला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेला राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऋतुजा लटके यांची बाजू वकील विश्वजित सावंत यांनी मांडली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी याकरिता खंडपीठासमोर मेंशनिंग दरम्यान मागणी केली होती 14 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने यावर उद्याच तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली (Hearing oF Rituja Latke) आहे.

उच्च न्यायालयात धाव - ऋतुजा लटके यांनी त्यांच्या याचिकेत असे म्हटले आहे की, तीन तारखेला राजीनामा देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही. नोटीस स्प्रेडच्या तीस दिवस पूर्ण होत नसल्याचे कारण दिले असल्याने नियमाप्रमाणे एका महिन्याचा पगार देखील जमा करण्यात आला आहे. तसेच राजीनामा देता वेळी देण्यात आलेल्या कारणांमध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यात येणार आहे या संदर्भात मी कुठलाही उल्लेख केलेला नाही. मात्र मला अंधेरी पोट निवडणूक लढवण्याचे इच्छा असल्याने राजीनामा मंजूर करण्यात यावा असे राजीनामा म्हटले आहे. मात्र तरीदेखील अद्यापही राजीनामा मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेण्यात आली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

राजिनामा मंजूर करण्याकरता नाटकं : अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र त्या महापालिका कर्मचारी असून त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. यावर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. यावेळी बोलताना, अनेकदा निवडणूकीआधी असे सापेक्ष राजिनामे दिले जातात. तसंच, नियमानुसार पेमेंट, अधिदान पालिकेकडे जमा केल्यानंतर एका दिवसातही राजिनामा मंजूर केला जाऊ शकतो. महापालिकेचे कुठलेही चूकीचे शेरे ऋतुजा लटकेंच्या नावावर नाहीत. त्या साध्या क्लार्क पदावर कार्यरत आहेत. एका क्लर्कचा राजिनामा मंजूर करण्याकरता इतकी नाटकं केली जात आहेत, अशी टीका पेडणेकर यांनी केली.

सनदी अधिकारी हे कुणाचेच नसतात : शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा साजरा करण्यासाठी अशीच नाटकं केसी गेली. त्यानंतर कोर्टानंच महापालिकेला तोंडावर पाडलं. काही सनदी अधिका-यांच्या आडमुठेपणामुळे महापालिका स्वता:ची स्वायतत्ता घालवून बसेल. सनदी अधिकारी हे कुणाचेच नसतात. आम्ही महापालिका शिवसेनेच्याच जोरावर वाढवली आणि टिकवली. सनदी अधिकारी देशाचे जावई असतात. ते स्वत:च्याच मस्तीत असतात अशी टीका पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांचे नाव न घेता पेडणेकर यांनी केली.

चूकीचे समज पसरवले जातायेत
रमेश लटकेंच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबाशी घाणेरड्या पद्धतीनं वागलं जाणार नाही. लटकेंना डावलून विश्वनाथ महाडेश्वरांना किंवा दुस-या कुणाला उमेदवारी असे चूकीचे समज पसरवले जातायेत. हा समज पसरवणं म्हणजे सुसंस्कृतपणा संपवणं आहे. बी प्लान पक्षाकडे तयार असावाच लागतो, कोर्टाचा निकाल काय येतोय त्यानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनिती ठरेल. महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ झालंय की बातम्यांच्या चॅनेलचा टिआरपी कोसळलाय. लोकांनी न्यूज चॅनेल सोडून आता सासु सुनांच्या सिरीयल पाहाणं सुरु केलंय असे पेडणेकर म्हणाल्या.

Last Updated : Oct 13, 2022, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.