ETV Bharat / city

खासगी शिवनेरी व शिवशाही बसेस त्वरित बंद करण्याची कामगार सेनेची मागणी

author img

By

Published : Apr 12, 2021, 7:06 PM IST

भाडेतत्वावरील खासगी शिवनेरी, अश्वमेघ व शिवशाही बसेस त्वरित बंद करण्याची मागणी हिरेन रेडकर यांनी परिवहन मंत्री आणि एसटीचे उपाध्यक्ष यांना केली आहे.

शिवशाही
शिवशाही

मुंबई - कोरोनाच्या टप्प्यात साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने मिनी लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे. अशा परिस्थितीत महामंडळाकडून भाडेतत्वावरील खासगी शिवनेरी व शिवशाही या वातानुकूलित बसेस चालविल्याने एसटीचे नुकसान होत असून या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे केली आहे.

एसटी महामंडळाला दुहेरी फटका-

कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी विकेन्ड लॉकडाऊन व सोमवार ते शुक्रवार जमावबंदीचे आदेश आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत या बसेस चालविल्यास त्याचा एसटी महामंडळाला दुहेरी फटका बसत असल्याने त्यांच्या फेऱ्या रद्द कराव्या असे रेडकर यांचे म्हणणे आहे. महामंडळाने आपल्याकडील बसेस चालविल्यास तोटा कमी होईल असेही रेडकर यांनी म्हटले आहे.

.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.