ETV Bharat / city

समाजमाध्यमातून वाढले सायबर गुन्हे, तरुणाई सापडली विळख्यात - सोशल मीडिया गुन्हे

फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर स्वतःचे फोटो, वैयक्तिक माहिती, ईमेल आणि मोबाईल क्रमांक पोस्ट करणे धोक्याचे आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Aug 21, 2019, 4:17 PM IST

Updated : Aug 21, 2019, 5:28 PM IST

मुंबई - देशात फेसबुकच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे समोर आले आहे. फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर लॉटरी आणि ऑनलाईन व्हिडीओ गेमच्या माध्यमातून फेसबुक युजर्सना वेगळ्याच संकेत स्थळांवर लॉग इन करण्यास सांगून संबंधित व्यक्तीचे बँक अकाउंट डिटेल्स, पॅनकार्ड, आधारकार्ड डिटेल्स घेऊन नागरिकांना फसवले जात आहे.

सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देताना तज्ञ आणि विद्यार्थी

भारत हा जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतात तरुण वर्ग हा सर्वाधिक फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर आपला वेळ खर्ची करताना पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्याच प्रमाणात या इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हे करणारे हॅकर जगातल्या कुठल्याही ठिकाणाहून अगदी सहज आपले सावज टिपून आर्थिक गुन्हे करत आहेत.

फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर स्वतःचे फोटो, वैयक्तिक माहिती, ईमेल आणि मोबाईल क्रमांक पोस्ट करणे धोक्याचे आहे. बऱ्याच प्रकरणात एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी फेसबुक अकाउंटवरील खासगी फोटो मॉर्फ करुन समाज माध्यमांवर व्हायरल केले जात आहेत.

सायबर गुन्हा नेमका आहे तरी काय?

संगणक, मोबाइल किंवा इंटरनेटसह इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्‍सचा गैरवापर करुन एखादी व्यक्ती किंवा समूहाला शारीरिक, मानसिक हानी पोहचविण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेले कृत्य म्हणजे सायबर गुन्हा होय.

सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार

वैयक्तिक स्वरुपातील संवेदनशील माहितीची चोरी किंवा परस्पर देवाण-घेवाण, हॅकिंग (डिनायल ऑफ सर्व्हिस), आर्थिक फसवणूक (फिशिंग, स्पूफिंग), अश्लील मजकूर (पोर्नोग्राफी), कॉपीराइट आणि बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन हे सर्व गुन्हे सायबर गुन्हे प्रकारात मोडतात.

Intro:भारत हा जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतात तरुण वर्ग हा सर्वाधीक फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर आपला वेळ खर्ची करताना पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे इंटरनेट चा वापर वाढत आहे त्याच प्रमाणात या इंटरनेट च्या माध्यमातून सायबर गुन्हे करणारे हॅकर जगातल्या कुठल्याही ठिकाणाहून अगदी सहज आपले सावज टिपून आर्थिक गुन्हे करीत आहेत.
Body:अशातच फेसबूक च्या माध्यमातून सायबर गुन्हे घडण्याचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत चालल्याचे आता समोर आले आहे. फेसबूक सारख्या समाज माध्यमांवर लॉटरी , व ऑन लाईन व्हिडीओ गेम च्या माध्यमातून फेसबुक युजर्सना वेगळ्याच संकेत स्थळांवर लॉग इन करण्यास सांगून संबंधित व्यक्तीचे बँक अकाउंट डिटेल्स व पॅन कार्ड , आधार कार्ड डिटेल्स घेऊन हातोहात पीडित व्यक्तीला फसविले जातंय. फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर स्वतःचे फोटो, वैयक्तिक माहिती , ईमेल , मोबाईल क्रमांक पोस्ट करणेही धोक्याचे आहे. बऱ्याच प्रकरणात एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी फेसबूक अकाउंटवरील खासगी फोटो मॉर्फ करून समाज माध्यमांवर व्हायरल केले जात आहेत.

बाईट _ अंकुर पुराणिक ( सायबर एक्सपर्ट )

बाईट - किरण सोनार ( कॉलेज विद्यार्थी )

बाईट-- अजय अडसूळ ( कॉलेज विद्यार्थी )

Conclusion:null
Last Updated : Aug 21, 2019, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.