ETV Bharat / city

Hanuman Chalisa Book Sale Hike : मुंबईत हनुमान चालीसाच्या पुस्तकांना मागणी वाढली; विक्री जोरात

author img

By

Published : Apr 28, 2022, 6:43 PM IST

Updated : Apr 28, 2022, 7:52 PM IST

भोंग्यांनंतर राज्यात हनुमान चालीसाचे राजकारण (Hanuman Chalisa Controversy) सुरू झाले. जवळपास सर्वच पक्षांचे नेते आता आपल्या जाहीर सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये एका दमात हनुमान चालीसा म्हणून दाखवू लागले आहेत. या राजकारणामुळे अनेक पुस्तक विक्रेत्यांकडे (Hanuman Chalisa Book Sale Hike in Mumbai) मात्र आता हनुमान चालीसाच्या पुस्तकांची मागणी वाढली आहे.

hanuman chalisa book
हनुमान चालीसा पुस्तक

मुंबई - भोंग्यांनंतर राज्यात हनुमान चालीसाचे राजकारण (Hanuman Chalisa Controversy) सुरू झाले. जवळपास सर्वच पक्षांचे नेते आता आपल्या जाहीर सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये एका दमात हनुमान चालीसा म्हणून दाखवू लागले आहेत. त्यांच्यात स्पर्धाच लागली आहे असे म्हणावे लागेल. मोठ्या नेत्यांच्या या स्पर्धेमुळे आता छोटे नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील हनुमान चालीसाचे पाठांतर करायला सुरुवात केली आहे. या राजकारणामुळे अनेक पुस्तक विक्रेत्यांकडे (Hanuman Chalisa Book Sale Hike in Mumbai) मात्र आता हनुमान चालीसाच्या पुस्तकांची मागणी वाढली आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही मुंबईच्या गिरगाव परिसरात मागची 78 वर्ष धार्मिक पुस्तकांची विक्री करणारे 'बळवंत पुस्तक भांडार' (Balvant Pustak Bhandar Girgaon) गाठले. या दुकानाचे मालक मकरंद परचुरे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

मकरंद परचुरे - मालक, बळवंत पुस्तक भांडार

हेही वाचा - Ajit Pawar in Aurangabad : हनुमान चालीसा आपल्या घरी म्हणा, इथेच का? अजित पवारांची टोलेबाजी

हनुमान चालीसाच्या पुस्तकांची मागणी वाढली - परचुरे सांगतात की, "हनुमान चालीसाच्या पुस्तकांची मागणी पहिली सुद्धा होती. मात्र, तेव्हा एखादी काही अडचण आल्यास अथवा एखाद्या ज्योतिषाने पुस्तक वाचन करायला सांगितलं तर लोक हनुमान चालीसा घेऊन जात होते आणि वाचत होते. मात्र, आता हे सर्व सुरू झाल्यापासून या मागणीत थोडी वाढ नक्कीच झाली आहे. हनुमान जयंतीच्या वेळी चांगला खप झाला. लोकांची मागणी जास्त होती. हा वाद सुरू होण्याआधी सुद्धा लोक पुस्तक मागायची पण प्रमाण कमी होतं ते आता नक्कीच वाढलेय."

या निमित्ताने लोक वाचत आहेत यात आनंद आहे - "यानिमित्ताने का होईना लोक हनुमान चालीसा वाचायला लागली आहेत याचाच आनंद आहे. कारण काहीही असो लोक आता वाचत आहेत याचे समाधान आहे. लोकांना हनुमान चालीसा माहिती होते यातपण समाधान आहे. मग कारण कोणतेही असो राजकीय, वैयक्तिक कोणतेही, पण लोक वाचत आहेत त्यातच समाधान आहे." असे परचुरे सांगतात.

78 वर्षाचा दुकानाचा इतिहास - 1944 साली गिरगावातील शंकर शेठ रोड येथे बळवंत पुस्तक भांडारची स्थापना झाली. मागच्या या 78 वर्षात जवळपास तीन पिढ्यांनी हे दुकान चालवले आहे. सध्या मकरंद परचुरे हे दुकानाचा कारभार पाहतात. दुकानासोबतच त्यांचे प्रकाशन देखील आहे. परचुरे यांच्या दुकानात मात्र कोणतीही कथा कादंबऱ्यांची पुस्तक, शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके मिळत नाहीत. इथे फक्त धार्मिक पुस्तकं मिळतात.

दरम्यान, आता या सुरू झालेल्या हनुमान चालीसाच्या राजकारणाचा पुढचा अध्याय काय ठरतो हे राज ठाकरे यांच्या एक तारखेच्या सभेनंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा - VIDEO : भोंगा, हनुमान चालीसावरचे राजकारण थांबवले नाही, तर रस्त्यावर उतरू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

Last Updated : Apr 28, 2022, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.