ETV Bharat / city

Kishori Pednekar : '...पण बबली ना समझ है'; किशोरी पेडणेकरांची नवनीत राणांवर टीका - माजी महापौर किशोरी पेडणेकरांची राणावर टीका

'आम्हाला वाटले बबली मोठी झाली. बबली मोठी नाही, पण बबली ना समझ है,' अशी जोरदार टीका माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी राणांवर केली ( Kishori Pednekar Slams Navneet Rana ) आहे.

kishori pednekar navneet rana
kishori pednekar navneet rana
author img

By

Published : May 8, 2022, 10:52 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. त्यानंतर आता माजी महापौर किशोरी पेडणकर यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. 'आम्हाला वाटले बबली मोठी झाली. बबली मोठी नाही, पण बबली ना समझ है,' अशी जोरदार टीका किशोरी पेडणेकरांनी राणांवर केली ( Kishori Pednekar Slams Navneet Rana ) आहे.

लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंनी जनतेतून निवडणूक लढवून दाखवावी. त्यांनी महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडावा, नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवू, असे आव्हान राणांनी दिले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी राणांवर सडकून टीका केली आहे. किशोरी पेडणेकर यांनीही राणा यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला.

"खाजेवर औषध आहे" - किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, तुझी लायकी आहे, का लोकशाहीने अधिकार दिला म्हणून काही बोलायचे. खासदार आहे ना मग त्याप्रमाणे तुमचे वर्तन असू दे. आम्हाला वाटले होते, बबली मोठी झाली. बबली मोठी नाही, पण बोलली ना समझ आहे. मागचा ऍम्प्लिफायर लावला जातोय आणि ती खाज वाढतेय. पण, त्या खाजेवर आमच्याकडे औषध आहे, असा इशाराही पेडणेकरांनी दिला आहे.

'सगळं काही दंगल घडवण्यासाठी' - नवनीत राणा जाणून-बुजून महाराष्ट्र आणि मुंबईत दंगल घडवण्यासाठी, अशी वक्तव्य करत आहेत. त्या बोलल्या ते हल्लाबोल नसून, त्यांच्यातील खाज आहे. त्यांच्या वक्तव्याला हल्लाबोल म्हणणे म्हणजे त्या शब्दाचा अपमान होईल. आपले मुख्यमंत्री हल्लाबोल करण्यासारखे नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगल्या कामामुळे केवळ राज्यातच नव्हे तर देशात अव्वल आहेत. ही खरी दोघांची पोटशूळ आहे. एकाचा भोंगा आहे, तर दुसऱ्याचे सोंग आहे. ऍम्प्लिफायर तर वेगळाच आहे, असे म्हणत किशोरी पेडणेकरांनी राणा दाम्पत्यासह राज ठाकरेंवर ही निशाणा साधला आहे.

हेही वाचा - Sadabhau Khot : 'मुख्यमंत्र्यांचा बोलवता धनी हा बारामतीला'; सदाभाऊ खोतांची उद्धव ठाकरेंवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.