ETV Bharat / city

FCI Foodgrain Stocks : एफसीआयकडे पुढील दोन वर्ष पुरेल इतका धान्यसाठा शिल्लक!

author img

By

Published : Apr 15, 2022, 4:45 PM IST

दोन वर्ष पुरेल इतका साडेचार कोटी अन्नधान्य साठा एफसीआईकडे ( Four and half crore foodgrain stocks FCI ) शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भारत निर्यातदार देश म्हणूनही पुढे येत आहे. देशातील तांदूळ आणि गव्हाचा साठा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( Food Corporation of India ) या यंत्रणेच्या देशभरातील सर्व गोदामांमध्ये साठविण्यात येतो.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई - देशात सध्या पुरेसा अन्नधान्यसाठा उपलब्ध असून देशाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. पुढील दोन वर्ष पुरेल इतका साडेचार कोटी अन्नधान्य साठा एफसीआईकडे ( Four and half crore foodgrain stocks FCI ) शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भारत निर्यातदार देश म्हणूनही पुढे येत आहे. देशातील तांदूळ आणि गव्हाचा साठा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( Food Corporation of India ) या यंत्रणेच्या देशभरातील सर्व गोदामांमध्ये साठविण्यात येतो.

देशातील विविध भागांमधून गहू आणि तांदूळ खरेदी करण्यात येतो. देशातील पंजाब, हरियाणा, बिहार छत्तीसगड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केली जाते. सीडब्ल्यूसी, नाफेड आणि स्टेट वेअर हाऊसिंगच्या माध्यमातून ही खरेदी केली जाते. उत्तर प्रदेश पंजाब आणि हरियाणा येथे दररोज २६ ते २८ रॅक भरले जातात. देशभरातील एकशे तीस कोटी जनतेपैकी ८० कोटी लोकांना रेशन च्या माध्यमातून मोफत अथवा अल्प दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येते. हे सर्व धान्य मागणीनुसार फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून प्रत्येक जिल्ह्याला पुरवले जाते.

देशात किती आहे धान्यसाठा? : सर्वाधिक धान्य साठा पंजाब येथे असून १ कोटी ३८ लाख मेट्रिक टन साठा आहे. धान्य साठा बाबत गोदामांचे देशात पाच विभाग करण्यात आले आहेत. यात पूर्व, उत्तर- पूर्व, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम असे विभाग करण्यात आले आहेत. उत्तर-पूर्व विभागात सर्वात कमी म्हणजे आठ लाख तीन हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. पूर्व विभागात २८ लाख ४७ हजार मेट्रिक टन, उत्तर विभागात दोन कोटी ९१ लाख १४ हजार मेट्रिक टन, दक्षिण विभागात ६३ लाख १८ हजार मेट्रिक टन तर पश्चिम विभागात ४८ लाख ६८ हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. देशभरातील धान्याची आजची स्थिती पाहिली तर चार कोटी ३९ लाख ५३ हजार मेट्रिक टन धान्य साठा देशात उपलब्ध आहे. हा साठा दोन वर्षे पुरे तितका असल्याची माहिती फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

श्रीलंकेच्या मदतीला धावला भारत : परकीय चलनाच्या साठ्यात ७० टक्के घसरण झाल्याने चलनाचे अवमूल्यन झालेल्या श्रीलंकेत आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. भारताने श्रीलंकेच्या मदतीला जात श्रीलंकेला ४० हजार टन तांदूळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इजिप्तनेही भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. इजिप्तच्या कृषिमंत्र्यांनी भारतातून गहू आयातीची घोषणा केली, असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी; सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.