मुंबई - रामायण धारावाहिकेत 'रावण' हे पात्र साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे काल रात्री (दि. 5 ऑक्टोंबर) मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्रिवेदी हे मुळचे ईडरच्या कुकडिया गावचे रहिवाशी होते. ते बऱ्याच दिवसांपासून छोट्या मोठ्या आजारांनी त्रस्त होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
हेही वाचा - #jiodown : जिओचे नेटवर्क डाऊन! वापरकर्त्यांच्या तक्रारीनंतर जिओने दिले हे स्पष्टीकरण
सुमारे 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये केले काम
दूरदर्शनवर प्रसारित होणारे रामानंद सागर यांचे अत्यंत लोकप्रिय धारावाहिक 'रामायण' मध्ये त्रिवेदी यांनी रावणाचे पात्र साकारले होते. त्यांना लंकेश या नावाने ओळखले जायचे. त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका अशा प्रकारे बजावली की, आजही त्यांची तीच प्रतिमा लोकांच्या डोळ्यांसमोर आहे. त्रिवेदी यांची अभिनयाची सुरुवातीची कारकीर्द गुजराती रंगभूमीपासून सुरू झाली. त्यांनी आपल्या अभिनयातून आणि लोकप्रिय हिंदी धारावाहिक रामायणमधून नाव कमावले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी सुमारे 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनेक कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
रामायणात लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी यांनी अरविंद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, त्यांच्यासह अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी अरविंद त्रिवेदी यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा - घरगुती गॅसच्या दरात 15 रुपयांनी वाढ; जाणून घ्या, नवे दर