ETV Bharat / city

Face To Face Dhananjay Munde : विधानपरिषदेच्या सर्व जागा जिंकणार; धनंजय मुंडेंना विश्वास

author img

By

Published : Jun 18, 2022, 6:07 AM IST

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला आहे. पण, विधानपरिषदेच्या निवडणुकीत असा कोणताही फटका बसणार नाही, असे मतं सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना व्यक्त ( Dhananjay Munde React On Vidhan Parishad Election 2022 ) केलं.

Face To Face Dhananjay Munde
Face To Face Dhananjay Munde

मुंबई - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थी, ( Backward class students ) उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारण्यात येत असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Minister of Social Justice Dhananjay Munde ) यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थी, इतर उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थ्यांची मुख्य अडचण ही वसतिगृहे शिष्यवृत्ती संदर्भात असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावेत यासाठी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी नव्याने जागा घेऊन बांधकाम सुरू आहे तर, काही ठिकाणी सुरू असलेल्या वसतिगृहातील जागा वाढवण्याचे काम करण्यात येत आहेत. तसेच, ओबीसी आरक्षणासंदर्भात ( OBC reservation ) एम्पिरिकल डेटाबाबत विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा निर्णय - मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऊसतोड मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ऊस तोड मजूर स्थलांतरित होत असल्याने त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. जिथे जागा मिळत नाही तिथे भाड्याने जागा घेऊन वस्तीगृह उभारली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हा महत्त्वाचा भाग असतो. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये कोणताही अडथळा आलेला नाही. शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जात असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

एम्पिरिकल डेटा बाबत विरोधकांकडून दिशाभूल - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्य सरकारवर टीका करताना म्हटले होते की, सरकारने एम्पिरिकल डेटा योग्य पद्धतीने गोळा केला नाही. त्यावर बोलताना मुंडे म्हणाले की, वास्तविक हा सर्व प्रश्न फडणवीसांच्या काळात निर्माण झाला. त्यांनी ओबीसींचे प्रश्न योग्यरीत्या हाताळले नाहीत त्यामुळे आज ओबीसी आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. फडणवीस यांनी वेळ असताना एम्पिरिकल डाटा गोळा केला असता तर हा प्रश्नच उद्भवला नसता. त्यामुळे हे सर्व पाप फडणवीस सरकारचे आहे असा पलटवार मुंडे यांनी ( Dhananjay Munde React On Empirical Data OBC ) केला.

जातीवाचक गावाची नावे बदलली - राज्यातील अनेक गावांची नावे ही जातीवाचक नावे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या नावांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत सरकारने राज्यातील 19 हजार वाड्या, वस्त्या, गावांच्या नावापैकी दोन हजार गावांची नावे बदलण्यात आली आहेत. तर, 17 हजार गावांची नावे लवकरच बदलली जातील असेही मुंडे यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांच्या मंडळासाठी मदत - राज्यातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून विभागीय, जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांची सोडवणूक करणे आणि त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुंडे ( Dhananjay Munde React On Transgender ) म्हणाले.

विधान परिषदेच्या सर्व जागा जिंकणार - राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला फटका बसला. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत असा कोणताही फटका बसणार नाही. सहयोगी पक्ष, अपक्ष आमच्या सोबत असल्याने आमच्या सर्व जागा नक्कीच जिंकून येतील असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला ( Dhananjay Munde React On Vidhan Parishad Election 2022 ) आहे.

हेही वाचा - Face To Face Subhash Desai : नव्या गुंतवणूक करारामुळे 1 लाख रोजगार निर्मिती होणार, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.