ETV Bharat / city

Governor Event in Virar : प्रत्येक घटकाने आर्थिक मदत करून सामाजिक जबाबदारी उचलावी - राज्यपाल

author img

By

Published : Apr 4, 2022, 7:28 AM IST

करोनामुळे पालक गमावलेल्या अपंग मुलांकरिता विरारच्या अर्नाळा येथे नूतन गुळगुळे फाऊंडेशनतर्फे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. (Governor Koshyari In Virar) त्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भूमीपुजन करताना

मुंबई - सरकारने चांगले काम करू शकत नाही तर त्यांनी किमान अडथळा तरी निर्माण करू नये, असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला आहे. ते रविवारी (3 एप्रिल)रोजी विरार येथे बोलत होते. करोनामुळे पालक गमावलेल्या अपंग मुलांकरिता विरारच्या अर्नाळा येथे नूतन गुळगुळे फाऊंडेशनतर्फे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. (Helping Children Lost Parent Due To Corona) या कार्यक्रमासाठी कोश्यारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात राज्यपालांनी अनेकांना कोपरखळ्या मारल्या.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कामे करताना अडथळा न आणता कामे सरकारने करावी - करोनामुळे पालक गमावलेल्या अपंग मुलांकरिता विरारच्या अर्नाळा येथे नूतन गुळगुळे फाऊंडेशनतर्फे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचे कोश्यारी यांच्या हस्ते 'स्वानंद सेवा सदन' या वास्तूचे भूमिपूजन संपन्न झाले. आपल्या भाषणात राज्यपालांनी अनेक कोपरखळ्या मारल्या. जो अडथळे दूर करून त्यावर मात करत मार्ग काढतो तोच खरा आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि राज्यपाल असू शकतो असे म्हणत अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर त्यांनी टीका केली आहे.

आर्थिक मदत करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी - ज्या दिव्यांग बालकांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी पालक उचलू शकत नाहीत, अशा बालकांसाठी स्वयंसेवी संस्था कार्य करत असतात. या संस्थांमार्फत विद्यार्थ्यांचे पालन पोषण तर होतेच, तसेच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वयंसेवी संस्था उचलत असते. अशा स्वयंसेवी संस्थांना समाजातील दानशुरांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकाने आर्थिक मदत करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही राज्यपाल कोश्यारी यांनी केले.

फाऊंडेशनला २५ लाखांची मदत - मला ऐनवेळी हेलिकॉप्टर नाकारून रस्त्याने प्रवास करावा लागला. ते एका अर्थाने चांगले झाले कारण मला वसईची खरी परिस्थिती पाहता आली अस यावेळी राज्यपाल म्हणाले. या वेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, मुंबई माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन गुळगुळे, जिल्हाधिकारी माणिक गुरसळ आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फाऊंडेशनला २५ लाखांची तसेच खासदार राजेंद्र गावित यांनी खासदार फंडातून १५ लाखांची मदत जाहीर केली.

हेही वाचा - Nitin Gadkari Meet With Raj Thackeray : केंद्रीय मंत्री भाजप नेते नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.