ETV Bharat / city

महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्काराने मध्य रेल्वेच्या आठ कर्मचाऱ्यांचा सन्मान - मध्य रेल्वेच्या आठ कर्मचाऱ्यांचा सन्मान

जीवाची बाजी लावून रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे अनुचित प्रकार रोखणाऱ्या आठ जणांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान केला.

न
author img

By

Published : Dec 7, 2021, 11:56 PM IST

मुंबई - रेल्वे सेवा, मालवाहतूक सेवा सुरू ठेवताना अनेक अनुचित प्रकार घडतात. मात्र, जीवाची बाजी लावून रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे अनुचित प्रकार रोखले आहेत. मध्य रेल्वेतील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत प्रसंगावधान दाखविणाऱ्या आठ रेल्वे कर्मचाऱ्यांचा सुरक्षा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेच्या ८ कर्मचार्‍यांना कर्तव्यादरम्यानच्या सतर्कतेचे कौतुक म्हणून महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान केला.

या आठ जणांना मिळाला पुरस्कार

कर्जत, मुंबई विभागातील ट्रॅक मेंटेनर ऋषिकेश काळुराम पारणेकर व अनंता शंकर लोभी, सहायक लोको पायलट पुष्पेंद्र मीणा, सोलापूर विभागाचे शकिल जमादार, दादासाहेब महादेव शिंदे, लोको पायलट संजय चव्हाण, नागपूर विभागाचे वरिष्ठ गुड्स गार्ड प्रवीण कुमार प्रभाकर व भुसावळ विभागातील नगरदेवळा स्थानकाचे उप स्टेशन व्यवस्थापक सुजित कुमार या आठ जणांना पुरस्कार देण्यात आले.

दाखवलेली सतर्कता इतरांना प्रेरणा देणारी -

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले आहे. संरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कता इतरांना प्रेरणा देईल आणि प्रवाशांच्या संरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करेल.

हे ही वाचा - ST Workers Suspension : १३५ एसटी कर्मचारी निलंबित; कारवाईचा आकडा नऊ हजारांचा पुढे!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.