मुंबई - डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंग विरुद्ध माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात अपील होणार या आधीच 'कॅव्हेट' दाखल केली आहे. अनिल देशमुख आणि राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यास मूळ तक्रारदार जयश्री पाटील यांचीही बाजू ऐकली जावी, यासाठी याचिका जयश्री पाटील यांच्याकडून दाखल केली गेली आहे.
महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, ज्यात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या सीबीआय चौकशीसंबंधित आदेशाला आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंग यांच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याआधी, मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांपैकी वकील जयश्री पाटील यांनीही सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेताच उच्च न्यायालयात याचिका कर्त्यांपैकी जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल केली आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोर्टाने त्यांची सुनावणी घ्यावी, असे कॅव्हेटमध्ये म्हटले आहे.