ETV Bharat / city

मोठी बातमी : आर्यन खानला धक्का: न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

आर्यनला काल न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. त्यानंतर आज आर्यनच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Aryan Khan
आर्यन खान
author img

By

Published : Oct 8, 2021, 5:25 PM IST

Updated : Oct 8, 2021, 6:38 PM IST

मुंबई - मुंबई ते गोवा जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर ड्रग्स पार्टी चालू असल्याची माहिती मिळाल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी रात्री छापा टाकला होता. यात शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्यासह आठ जणांना अटक केली होती. गुरुवारी(7 ऑक्टोबर) या आठ जणांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड (किल्ला कोर्ट) यांच्या कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज(8 ऑक्टोबर) आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि सरकारी वकील यांच्यात जामीन अर्जावर जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीश आर. एम. निर्लेकर यांनी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज नाकारला आहे. यामुळे आता आर्यनचे वकील जामिनासाठी सत्र न्यायालय म्हणजेच सेशन कोर्टात दाद मागणार आहेत.

माहिती देताना वकील

हेही वाचा - Cruise Drug Case : आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये

  • काय झाले आज कोर्टात?

आर्यन खानसह आठ आरोपींच्या जामीन अर्जावर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड यांच्या कोर्टात दुपारी सुनावणी सुरु झाली. यावेळी एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खान, अरबाज मर्चंट तसेच मुनमुन यांना जामीन दिल्यास पुरावे मिटवले जाण्याची शक्यता असल्याने त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद करण्यात आला. यावर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी, कमी प्रमाणात ड्रग्स पकडले तरी त्या लोकांशी कशा प्रकारचा व्यवहार केला जातो याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा दाखला दिला. तसेच उच्च न्यायालये अशा आरोपींना जामीन मंजूर करण्यात उदार आहेत. परंतु तक्ररदार अजूनही जामिनाला विरोध करत आहेत. आर्यनकडे काहीही मिळाले नाही तरीही त्याचे भांडवल केले जात आहे. जर न्यायालयाने जामीन अर्जांच्या स्थिरतेवर निर्णय घेण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या अंतरिम जामीन अर्जावर निर्णय घ्यावा. आपण तांत्रिकतेवर उभे राहू नये, गुणवत्तेवर जाऊया. कारण गुणवत्तेशिवाय तांत्रिकतेचा उपयोग नाही. आर्यन खान २३ वर्षाचा आहे. तो बॉलिवूडमधील असल्याने तो तिथे गेला. त्याच्याकडे काही ड्रग्स आहेत का असे विचारले असता त्याने आपल्याकडे ड्रग्स नसल्याचे सांगितले आहे. आर्यन एका श्रीमंत कुटुंबातील सदस्य आहे. याचा अर्थ असा नाही की तो पुराव्यांशी छेडछाड करेल. त्याने आतापर्यंत तपास यंत्रणेवर कोणताही प्रभाव पाडलेला नाही. गेल्या सहा दिवसांपासून तो एनसीबीला सहकार्य करत आहे. यामुळे आर्यनला जामीन द्यावा, अशी मागणी मानेशिंदे यांनी केली.

  • काय आहे नेमके प्रकरण?-

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यावेळी १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस, २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यामधील आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तीन जणांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पुन्हा आठ जणांना न्यायालयात हजर केले असता, ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली होती. काल, ७ ऑक्टोबरne आर्यन खानसह आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणी अद्याप १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Cruise Drug Case LIVE: दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Last Updated : Oct 8, 2021, 6:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.