ETV Bharat / city

लॉकडाऊन, लसीच्या तुटवड्यानंतरही 37 हजार 489 लाभार्थ्यांना लस, आज लसीकरण ठप्प?

author img

By

Published : Apr 25, 2021, 8:07 AM IST

आतापर्यंत एकूण 2 लाख 74 हजार 618 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 13 हजार 785 फ्रंटलाईन वर्कर, 8 लाख 61 हजार 383 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 7 लाख 64 हजार 078 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीच्या तुटवड्यानंतरही 37 हजार 489 लाभार्थ्यांना लस, आज लसीकरण ठप्प?

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सध्या मुंबईत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र लसीचा सातत्याने तुटवडा जाणवत असल्याने अनेक केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यातच मुंबईत लॉकडाऊनही आहे. तरीही शनिवारी 37 हजार 489 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. लसीचा साठा कमी असल्याने रविवारी मात्र लसीकरण मोहीम ठप्प होण्याची शक्यता आहे.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत शनिवारी 37 हजार 489 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 18 हजार 846 लाभार्थ्यांना पहिला तर 18 हजार 643 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 22 लाख 13 हजार 864 लाभार्थ्यांना लस देण्यात आली, त्यात 18 लाख 57 हजार 439 लाभार्थ्यांना पहिला तर 3 लाख 56 हजार 425 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

आतापर्यंत एकूण 2 लाख 74 हजार 618 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 13 हजार 785 फ्रंटलाईन वर्कर, 8 लाख 61 हजार 383 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 7 लाख 64 हजार 078 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीचा तुटवडा -

मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढताच लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली आहे. यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लसीचा साठा कमी असल्याने बहुतेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. 50 हजार लसीचा साठा शुक्रवारी रात्री आला होता. त्यापैकी 37 हजार 489 लाभार्थ्यांचे लसीकरण शनिवारी करण्यात आले. उरलेल्या सुमारे 12 हजार 500 लसीचा साठा उद्या रविवारी वापरला जाणार आहे. मात्र हा लसीचा साठा कमी आहे. हा साठा संपल्यावर मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे.

तसेच अपेक्षित असा लसीचा साठा आल्यास रविवारी सर्व केंद्र लसीकरणासाठी खुली केली जातील. तो पर्यंत जो लसीचा साठा आहे तो जपून वापरावा व ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांनाच लस देण्यात यावी, असे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत. लसीचा साठा आल्यावर आणि ती लसीकरण केंद्रामध्ये पोहोचल्यावर लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे आजचे लसीकरण उशिरा सुरू होईल असे सांगण्यात आले आहे.

एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,74,618
फ्रंटलाईन वर्कर - 3,13,785
जेष्ठ नागरिक - 8,61,383
45 ते 59 वय - 7,64,078
एकूण - 22,13,864

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.