ETV Bharat / city

भाजीपाला-फळे यांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवा, सहकार पणन मंत्र्यांची बाजार समितीला सूचना - news about co-operative minister

कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यात बाजार समितीचे कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. या वेळी त्यांनी बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचनाही दिल्या.

co-operative-minister-suggested-the-market-committee-keep-supply-of-vegetables-fruits
बाजार समितीने भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवावा सहकार पणन मंत्र्यांच्या सूचना
author img

By

Published : Apr 7, 2020, 8:37 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बाजार समितीचे कामकाज सुरू ठेऊन भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या. राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेंच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची सहकार मंत्र्यानी विडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली.

बैठकीत पाटील म्हणाले, बाजार समित्यांमध्ये कामकाज चालू ठेवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन कामकाज सुरू ठेवावे. बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग पाळावे, सॅनिटायझरचाही वापर करावा. सहकार व पणन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी कोरोना या आपत्कालीन परस्थितीमध्ये मानवतेच्या दृष्टीने सहकार्य करणे आवश्यक असून कोणीही मुख्यालय सोडू नये अशा स्पष्ट त्यांनी सूचना दिल्या.

सर्व विभागीय सहनिबंधक जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना संपर्क साधून त्यांना शेतकरी उत्पादक गट कंपन्यांमार्फत थेट फळे आणि भाजीपाला पुरवठा करण्यासाठी प्रयत्न कारावेत त्यामुळे ग्राहक घराबाहेर येणार नाहीत आणि गर्दीही होणार नाही. असेही श्री. पाटील यांनी यावेळी संगितले.

सद्यस्थितीत सांगली बाजारसमितीमध्ये हळदीचे सौदे बंद असून हे पूर्वरत करण्यासाठी धुळे बाजारसमितीने जी टोकन पद्धत राबवली आहेत त्या धरतीवर त्वरित कामकाज सुरू करण्यात यावे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी विभागाशी समन्वय ठेऊन कामकाज करावे आशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.

बैठकीस सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे, एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आखरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख, उपसंचालक मा.टिकोळे, सहकार मंत्र्यांचे खाजगी सचिव संतोष पाटील, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.