मुंबई : भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला ( Pankaja Munde Corona Infected ) आहे. यापूर्वीही एकदा पंकजा यांना कोरोनाची बाधा झाली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह ( Pankaja Munde Covid Test Positive ) आल्यानंतर त्यांनी स्वतःला घरच्या घरीच क्वारंटाईन ( Pankaja Munde Quarantined ) केले आहे.
-
Corona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली...लक्षणं आणि Corona दोन्ही आहे... सर्वानी काळजी घ्यावी..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Corona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली...लक्षणं आणि Corona दोन्ही आहे... सर्वानी काळजी घ्यावी..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 1, 2022Corona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली...लक्षणं आणि Corona दोन्ही आहे... सर्वानी काळजी घ्यावी..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 1, 2022
ट्विट करत दिली माहिती
ट्विट करून त्यांनी ही माहिती ( Pankaja Munde Tweet ) दिली. कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्याने मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि कोरोना दोन्हीही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबईतील घरी उपचार सुरु
पंकजा या सध्या त्यांच्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. राज्यातील अनेक नेते, मंत्र्यांना कोरोना झाल्यानंतर आता पंकजा यांनाही कोरोना झाला आहे.