मुंबई - ड्रग्ज केस प्रकरणात एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. आर्यनला गुरूवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. आर्यनच्या वकिलांनी जामिनासाठी किला कोर्टात धाव घेतली असून, जामीन अर्ज फेटाळला आहे.
मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने टाकलेल्या धाडीत आठ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 14 जणांना ताब्यात घेतले आहे. यात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचा समावेश आहे. किल्ला कोर्टात या प्रकरणाची सुनवाई सुरू आहे. आर्यन खानसोबतच आठ जणांना जामीन मिळावा, असा युक्तिवाद न्यायालयात केला जातो. मात्र, ड्रग्ज प्रकरणात दोषी असल्याने त्यांना पोलीस कोठडी व्हावी, अशी एनसीबीची ठाम भूमिका आहे. शुक्रवार दुपारपासून कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येतो आहे. नुकतीच आर्यन खानसोबत आठ जणांची जे जे रुग्णालयात मेडीकल चाचणी आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यांना आर्थर रोड कारागृहातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - आर्यन खानला धक्का: न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज